agriculture news in marathi, onion export to other state, nashik, pune | Agrowon

‘नाफेड’चा साडेतेरा हजार टन कांदा जातोय दिल्ली, भुवनेश्वरला
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

नाशिक   : कांदा दरात स्थिरता यावी यासाठी नाफेडने एप्रिल ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत खरेदी केलेला १३ हजार ५०० मेट्रिक टन कांदा आता आठ ते दहा दिवसांपासून दिल्ली, आझादनगर, भुवनेश्वर या ठिकाणी पाठवण्यात येत असल्याची माहिती ‘नाफेड’चे संचालक नानासाहेब पाटील यांनी दिली.

सहा महिन्यांपासून हा कांदा खरेदी होत आहे. त्यामध्ये दररोज होणाऱ्या वातावरणाच्या बदलामुळे १५ ते २० टक्‍क्‍यांपर्यंत घट आणि नुकसान होत आहे. ज्या वेळी संपूर्ण चाळीमधून कांदा बाहेर काढण्यात येईल त्या वेळीच नुकसानीची आकडेवारी समोर येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

नाशिक   : कांदा दरात स्थिरता यावी यासाठी नाफेडने एप्रिल ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत खरेदी केलेला १३ हजार ५०० मेट्रिक टन कांदा आता आठ ते दहा दिवसांपासून दिल्ली, आझादनगर, भुवनेश्वर या ठिकाणी पाठवण्यात येत असल्याची माहिती ‘नाफेड’चे संचालक नानासाहेब पाटील यांनी दिली.

सहा महिन्यांपासून हा कांदा खरेदी होत आहे. त्यामध्ये दररोज होणाऱ्या वातावरणाच्या बदलामुळे १५ ते २० टक्‍क्‍यांपर्यंत घट आणि नुकसान होत आहे. ज्या वेळी संपूर्ण चाळीमधून कांदा बाहेर काढण्यात येईल त्या वेळीच नुकसानीची आकडेवारी समोर येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

कांदादरात चढ-उतार झाल्यानंतर दर समतोल ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने नाफेडमार्फत कांदा स्थिरीकरण फंड अंतर्गत कांदा खरेदी दरवर्षी करण्यात येते. या वर्षी २५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट होते. त्यानुसार नाफेडने साडेतेरा हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केला होता. तो आता विविध राज्यांत नाफेड तसेच इतर यंत्रणांमार्फत पाठवला जात आहे.

कांद्याचे घसरते दर आटोक्‍यात राहावे व ग्राहकांना योग्य दरात कांदा उपलब्ध व्हावा, या हेतूने तसेच कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडमार्फत किंमत स्थिरीकरण निधीच्या माध्यमातून २५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात आतापर्यंत तब्बल १३ कोटी रुपये खर्च करून १३ हजार ५०० मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे.

शेतीमालाच्या दरातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने डॉ. स्वामिनाथन आयोगाने सुचविलेल्या भाव स्थिरीकरण निधी योजनेसाठी मोठी आर्थिक तरतूद केली. त्यातून या वर्षी २५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट आहे. घाऊक बाजारात भाव घसरू नयेत म्हणून नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यांतील बाजार समित्यांमधून नाफेडने हा कांदा खरेदी केला आहे. केंद्र सरकारने नाफेडमार्फत खरेदी केलेला कांदा रवाना करण्यासाठी चाळीतून बाहेर काढला जात आहे. यातील वजनातील घट व हवामानाचा परिणाम यामुळे कांदा किती खराब निघतो हे लवकरच समजेल, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

 

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : वाल, आंबा, काजू, नारळ,...वाल काढणी अवस्था वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा...
तेल्हारा, अकोट तालुक्यांत अवकाळी पाऊस;...अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ,...
अमरावती जिल्ह्यात सव्वालाख शेतकऱ्यांची...अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन...
माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ...कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम...
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक...परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग...
पुणे जिल्ह्यात ११५ गावे पितात दूषित पाणीपुणे ः जिल्ह्यातील ११५ गावे चक्क दूषित पाणी पित...
शेतकरी सन्मान निधी योजनेत नगर...नगर : शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळवून...
शेतीमाल तारण, ई नाम पुरस्कारांचे...पुणे: शेतीमाल तारण आणि आॅनलाइन राष्ट्रीय कृषी...
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...