agriculture news in marathi, Onion grower farmers Demand for grant | Agrowon

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

येवला, जि. नाशिक : उन्हाळ कांद्याचे बाजारभाव घसरले आहेत. शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शासनाने कांद्यास हमीभाव ठरवून द्यावा. बाजार हस्तक्षेप योजना राबवून हमीभाव व शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भावातील फरकाची रक्कम शेतकऱ्यास द्यावी, अशी मागणी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे यांनी राज्य शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली.

येवला, जि. नाशिक : उन्हाळ कांद्याचे बाजारभाव घसरले आहेत. शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शासनाने कांद्यास हमीभाव ठरवून द्यावा. बाजार हस्तक्षेप योजना राबवून हमीभाव व शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भावातील फरकाची रक्कम शेतकऱ्यास द्यावी, अशी मागणी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे यांनी राज्य शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली.

राज्यासह परराज्यातील बाजार समित्यांमध्ये नवीन लाल कांद्याची आवक सुरू आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कांद्याच्या भावात घसरण होत आहे. उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
येवला बाजार आवारात बुधवारी (ता. ५) उन्हाळ कांद्याचे भाव किमान २०० ते कमाल ६९०, तर सरासरी ४२५ रुपये, तर लाल कांद्याचे भाव किमान ४००, कमाल ९३०, तर सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल होते.

मार्च, एप्रिलमध्ये चाळीत साठविलेल्या उन्हाळ कांद्याची प्रत घसरली आहे. यामुळे त्यास मागणी कमी आहे.
साठवून ठेवलेल्या कांद्यास उत्पादन खर्चाएवढाही भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. दुष्काळी स्थिती, पाणीटंचाई, अवकाळी पाऊस यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड दिले. बँका, सावकाराकडून कर्ज घेऊन शेतकऱ्याने कांद्यासारख्या नगदी पिकाचे उत्पादन घेतले. परंतु चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे दिसून येत आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले आहे.

इतर बातम्या
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...
जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।।जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।। पंढरीचा...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....
दीड हजार कोटींचा दुसरा हप्ता...मुंबई  ः गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या...
राज्यात गारठा पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह येऊ...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पंतप्रधान मोदी आज करणार महिला बचत...यवतमाळ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता...
पदव्युत्तर कृषी अभ्यासक्रमात पुढील...नागपूर ः कृषी अभ्यासक्रमात आजची परिस्थिती आणि...