agriculture news in marathi, Onion growers Aggressive in Satana | Agrowon

सटाण्‍यात कांदा उत्पादकांचा सभापतींना घेराव
ज्ञानेश उगले
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

सटाणा, जि. नाशिक (प्रतिनिधी) : गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने कांद्याच्या दरात होणारी घसरण व कांदा व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदी करण्यास आलेल्या निर्बंधाचा उद्रेक होत सटाणा बाजार समितीत संतप्त कांदा उत्पादकांनी गुरुवारी (ता. २६) दुपारच्या सत्रात कांदा लिलाव बंद पाडले.

सटाणा, जि. नाशिक (प्रतिनिधी) : गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने कांद्याच्या दरात होणारी घसरण व कांदा व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदी करण्यास आलेल्या निर्बंधाचा उद्रेक होत सटाणा बाजार समितीत संतप्त कांदा उत्पादकांनी गुरुवारी (ता. २६) दुपारच्या सत्रात कांदा लिलाव बंद पाडले.

या वेळी बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयाच्या बाहेर सभापती रमेश देवरे यांना कांदा उत्पादकांनी घेराव घातला. यामुळे तब्बल दोन तास कांदा लिलाव बंद पडले. दरम्यान, बाजार समिती सभापती देवरे यांनी कांदा विक्रेत्या शेतकरी बांधवांना विश्वासात घेऊन कांदा आवक व व्यापारी कमतरता लक्षात आणून दिल्यानंतर लिलाव पूर्ववत सुरू झाले.

सकाळी १० वाजेपासूनच कांदा व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करताना वाहनांचे निर्बंध घातले व कांदा दरदेखील सुमारे ५५० रुपये क्विंटलने घसरल्याने संतप्त झालेल्या कांदा विक्रेत्या शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडून आपला मोर्चा बाजार समिती प्रशासकीय कार्यालयावर वळविला. या वेळी बाजार समिती प्रशासक रमेश देवरे, सचिव तांबे यांना घेराव घातला. गत दोन दिवसांत कांद्याचे दर ३३०० रुपये क्विंटलवरून ५५० रुपये इतके घसरून थेट २७५० रुपये इतके झाले आहे.

याचा परिणाम कांदा उत्पादकांच्या नफ्यावर होऊन ट्रॅक्टरमागे शेतकऱ्यांचे १३ ते १५ हजार रुपयांचे नुकसान होत आहे, असे शेतकऱ्यांनी या वेळी सांगितले. त्यात कांदा व्यापाऱ्यांनी बाजार समिती आवारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात असताना कांदा खरेदी कमी करण्याचा सपाटा सुरू केला. यामुळे संतप्त कांदा विक्रेत्या शेतकऱ्यांनी सभापती व सचिवांना जाब विचारला.

कांदा खरेदीसंदर्भात दररोज माहिती वरिष्ठ कार्यालयात देण्यात येत असल्याचीदेखील माहिती या वेळी सभापती देवरे यांनी दिल्याने शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. या वेळी घेराव आंदोलनात दिलीप सूर्यवंशी, मनोज सोनवणे, किरण रौंदळ, लक्ष्मण सोनवणे, रूपेश सोनवणे, प्रदीप भामरे, भूपेंद्र निकम, अनिल सोनवणे, केशव सूर्यवंशी, मोती चौधरी, संपत सोनवणे, महेश सोनवणे आदी उपस्थित होते.

दर वाढविणे हा समितीचा विषय नाही

संतप्त झालेल्या कांदा विक्रेत्या शेतकऱ्यांना बाजार समिती सभापती रमेश देवरे यांनी सामंजस्याची भूमिका घेण्याचे सांगितले. तसेच कांद्याचे दर कमी करणे व वाढविणे हा बाजार समितीचा विषय नाही. मात्र कांदा आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, मजूरटंचाईअभावी व्यापारी कांदा खरेदी कमी प्रमाणात करत असल्याचे देवरे यांनी शेतकऱ्यांनी सांगितले. अशात सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत सद्यःस्थितीत व्यापारी कमतरतेमुळे संपूर्ण वाहने खरेदी करण्यातही अडचणी निर्माण होत असल्याची भूमिका देवरेंनी या वेळी मांडली.

कांदा व्यापाऱ्यांनी साखळी करून कांदा भाव जाणीवपूर्वक कमी करून कांद्याच्या खरेदीवर निर्बंध लादले असतील, तर कांदा उत्पादक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद करतील.
- लक्ष्मण सोनवणे, कांदा उत्पादक शेतकरी

कांद्याची बाजार समितीत वाढलेली आवक, व्यापाऱ्यांना जाणवणारी मजूरटंचाई यामुळे कांदा खरेदी करण्यास व्यापाऱ्यांना अडचणी येत आहेत. तसेच कांदा व्यापारी वाढविण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे.
- रमेश देवरे, सभापती, बाजार समिती सटाणा

इतर बातम्या
महारेशीम नोंदणीला अकोला, वाशीममध्ये...अकोला :  रेशीम शेती आणि उद्योगास प्रोत्साहन...
मुख्यमंत्री फडणवीस साधणार ‘लोक संवाद’ पुणे ः शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत...
मराठवाड्यात महारेशीम अभियानाला सुरवात औरंगाबाद ः रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान...
जळगावमधील सर्वच तालुके दुष्काळीजळगाव : जिल्ह्यातील सर्व गावांची अंतिम पैसेवारी...
‘पिंपळगाव खांड’तून पिण्यासाठी आवर्तनलिंगदेव, जि. नगर : मुळा नदीवरील पिंपळगाव खांड (ता...
पुणे विभागात रब्बीची अवघी ३४ टक्के पेरणीपुणे ः पावसाळ्यात कमी झालेल्या पावसामुळे गेल्या...
परभणीची खरिपाची अंतिम पैसेवारी ४४.६९...परभणी ः परभणी जिल्ह्याची खरीप हंगामाची अंतिम...
धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत ९० विहिरींचे...धुळे : पाणीटंचाईची तीव्रता धुळे, नंदुरबार...
कोल्हापूर जिल्ह्यात वाढती थंडी रब्बी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
कॅनॉल दुरुस्तीची कामे आता जलयुक्‍त...वर्धा : जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या...
सोलापूर कृषी समितीच्या बैठकीत...सोलापूर : गुजरातमध्ये राबविण्यात येणाऱ्या कृषी...
कांदा, भाजीपाला वाटला मोफतचांदवड, जि. नाशिक : कांद्यासह भाजीपाला व इतर...
पालखेडच्या आवर्तनास जिल्हाधिकाऱ्यांचा...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यावरील...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांचे होणार...सोलापूर : यंदाच्या गाळप हंगामात संबंधित...
औरंगाबादमध्ये २७ डिसेंबरपासून ‘ॲग्रोवन’...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व...
पावसातही शेतकऱ्यांचा आम नदीपात्रात...वेलतूर, नागपूर : टेकेपार येथील शेतकऱ्यांनी...
स्वाभिमानीचे डफडे बजाओ आंदोलनबुलडाणा ः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, सोयाबीन...
विदर्भातील तीन जिल्हा बँकांचे विलीनीकरण...मुंबई: राज्यातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या...
किमान तापमानात वाढ पुणे  : ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...
मराठवाड्यातील दुष्काळाची पैसेवारीने...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८५३३...