agriculture news in marathi, onion growers prefer indur market, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव, धुळ्यातील कांदा उत्पादकांची पसंती इंदूरच्या घाऊक बाजाराला
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 डिसेंबर 2017
धुळे ः धुळेसह जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादक कांदा विक्रीसाठी इंदूरच्या (मध्य प्रदेश) घाऊक बाजाराला पसंती देत आहेत. सध्या इंदूर येथे कांद्याला सरासरी साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहेत. खानदेशात पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे), चाळीसगाव (जि. जळगाव), धुळे, अडावद (ता. चोपडा) येथे सरासरी साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर आहेत. 
 
धुळे ः धुळेसह जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादक कांदा विक्रीसाठी इंदूरच्या (मध्य प्रदेश) घाऊक बाजाराला पसंती देत आहेत. सध्या इंदूर येथे कांद्याला सरासरी साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहेत. खानदेशात पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे), चाळीसगाव (जि. जळगाव), धुळे, अडावद (ता. चोपडा) येथे सरासरी साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर आहेत. 
 
धुळ्यासह शिरपूर, शिंदखेडा, चोपडा, शहादा, यावल या तालुक्‍यांमधील शेतकऱ्यांना इंदूर जाण्यासाठी चौपदरी महामार्ग आहे. धुळे किंवा यावल, चोपडा, शहादा येथून सकाळी कांदा घेऊन ट्रक किंवा इतर मालवाहूने शेतकरी निघाले तर सायंकाळपर्यंत पोचतात. सुमारे सात ते आठ तास लागतात. याशिवाय लिलाव होऊन लागलीच काही पैसे रोखीने उर्वरित पैसे आरटीजीएसने तेथील अडतदार शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करीत आहेत. शिवाय दरही धुळे, अडावद येथील कांदा बाजाराच्या तुलनेत अधिक मिळत असल्याने शेतकरी तेथील बाजाराला पसंती देत आहेत, अशी माहिती मिळाली.
 
सध्या धुळे व अडावद येथील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. मध्यंतरी आवकेत वाढ व साठवणुकीला जागा नसल्याने धुळे येथील बाजार समिती एक दिवस बंद ठेवण्याची वेळ आली होती. लिलाव बंद होते. धुळे जिल्ह्यात कापडणे, न्याहळोद, जापी आदी भागांत कांदा लागवड बऱ्यापैकी आहे. तर यावलमध्ये किनगाव, डांभुर्णी, साकळी भागांत लागवड चांगली झाली आहे. चोपडामध्ये अडावद, सुटकार, वर्डी, माचले भागांत लागवड असून, शहादामध्ये जयनगर, काकर्दा, नांदरखेडा, प्रकाशा भागांत लागवडीचे क्षेत्र बरे आहे. 
 
धुळे, अडावद, पिंपळनेर, चाळीसगाव येथील कांदा बाजार महत्त्वाचा असला, तरी कांद्याला तीन दर आहेत. लहान, मध्यम व मोठा, अशी प्रतवारी ठरवून दर दिले जात आहेत. सध्या आवक कमी असली तरी दर स्थिर आहेत. परंतु तीन दर परवडत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये आहेत.
 
किरकोळ बाजारात कांद्याला किमान ४० रुपये प्रतिकिलो दर आहे. ग्राहकांना कांदा महाग वाटत असला तरी शेतकऱ्यांकडून दिवाळीच्या वेळेस कवडीमोल दरात म्हणजेच ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलने घेतलेला कांदा आता ग्राहकांना चढ्या दरात दिला जात असल्याचे चित्र आहे. शासनाने कांदा व्यापाऱ्यांची साठवणूक व लुबाडणूक याकडे लक्ष दिले पाहिजे, असे शेतकरी संघटनेचे आत्माराम पाटील (कापडणे, ता. धुळे) यांनी म्हटले आहे. 

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...
अंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली  : वाढती उष्णतेची झळ...
व्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक  : अंदरसूल येथील कांदा...
'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर  ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...
दुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर  : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...
चंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर  ः काजूच्या...
पुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे  ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...
नांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड :  नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर  : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...
उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...
‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...
हिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
भाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...