agriculture news in Marathi, onion market rates, Maharashtra | Agrowon

राज्यात कांदा प्रतिक्विंटल ४०० ते २८२९ रुपये
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

मुंबईत प्रतिक्विंटल २२०० ते २८०० रुपये
मुंबई ः मुंबई मार्केटमध्ये कांद्याची आवक घटली आहे. आठवडाभरात सरासरी १३००० क्विंटल आवक आहे. मंगळवारी (ता. १०) कांद्यास प्रतिक्विंटल २२०० ते २८०० व सरासरी २५०० रुपये दर मिळाला. आवक कमी असल्यानेच कांदा दर वाढल्याचे स्थानिक कांदा व्यापारी राजू शेळके यांनी सांगितले. बाजार समितीतीत कांद्याला २० ते २१ प्रतिकिलो दर असून, ग्राहकांना ३५ रुपयांनी कांदा खरेदी करावा लागत आहे. मागील आठवड्यात मुंबईत कांद्याची १२७४० क्विंटल आवक होती. 

बाजार समितीतील आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये) 

मुंबईत प्रतिक्विंटल २२०० ते २८०० रुपये
मुंबई ः मुंबई मार्केटमध्ये कांद्याची आवक घटली आहे. आठवडाभरात सरासरी १३००० क्विंटल आवक आहे. मंगळवारी (ता. १०) कांद्यास प्रतिक्विंटल २२०० ते २८०० व सरासरी २५०० रुपये दर मिळाला. आवक कमी असल्यानेच कांदा दर वाढल्याचे स्थानिक कांदा व्यापारी राजू शेळके यांनी सांगितले. बाजार समितीतीत कांद्याला २० ते २१ प्रतिकिलो दर असून, ग्राहकांना ३५ रुपयांनी कांदा खरेदी करावा लागत आहे. मागील आठवड्यात मुंबईत कांद्याची १२७४० क्विंटल आवक होती. 

बाजार समितीतील आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये) 

दिनांक  आवक     किमान     कमाल     सरासरी
१० ऑक्टोबर  १५१२०     २२००     २८००     २५००
३ ऑक्टोबर ११५५०     १३००     १८००     १५५०
२६ सप्टेंबर  २६४६०     १४००     १८००     १६००
१९ सप्टेंबर  ९९४०     १२००     १६००     १४००
१२ सप्टेंबर  ९८००     १८००     २०००     १९००

नागपुरात प्रतिक्विंटल १८०० ते २२०० रुपये
नागपूर ः नागपूर बाजारपेठेत किरकोळ कांद्याचे दर ३८ ते ४० रुपये किलो असून, घाऊक बाजारात पांढरा कांदा १८०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलवर पोचला. बाजारात कांद्याची आवक १००० ते १५०० क्‍विंटल आहे. 

४ ऑक्‍टोबरला लाल कांद्याची आवक १८०० क्‍विंटल होती. १२०० ते १७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. पाच ऑक्‍टोबरला आवक १००० क्‍विंटल तर दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल झाले. ७ तारखेला आवक २००० क्विंटल तर दर २००० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल होते. १० ऑक्‍टोबरला लाल कांद्याची आवक १७०० क्विंटल तर दर २००० ते २५०० रुपये होते. ११ ऑक्‍टोबरला १५०० क्‍विंटलची आवक होती. बाजारात पांढऱ्या कांद्याची आवक आवक ७०० ते ९०० क्‍विंटल होत आहे. महिन्याच्या सुरवातीला १३०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल दर होते. ११ ऑक्‍टोबरपासून पांढरा कांदा १८०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलने विकला जात असून, ९३९ ते १००० क्‍विंटलची आवक होत आहे.

कोल्हापुरात प्रतिक्विंटल ८०० ते २७०० रुपये
कोल्हापूर: येथील बाजार समितीत कांद्याचे दर स्थिर आहेत. बुधवारी (ता. ११) कांद्यास प्रतिक्विंटल ८०० ते २७०० रुपये दर होते.

गेल्या पंधरवड्यापासून  कांदा उत्पादक प्रदेशात सातत्याने पाऊस पडत आहे. यामुळे कांद्याची आवक कमी-जास्त प्रमाणात होत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. येथील बाजार समितीत बहुतांशी कांदा नगर व परिसरातून येतो. गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याचे दर समाधानकारक आहेत. पावसाळी हवामानामुळे आणखी काही दिवस आवक कमी राहण्याची शक्यता आहे.

बाजार समितीतील आवक व दर (दहा किलोस/रुपये)

दिनांक     आवक     किमान     कमाल
११ आॅक्टोबर  ६६६७   ८०     २७०
४ आॅक्टोबर ५२००     ६०     २५०
२६ सप्टेंबर ७३००     ७०     २८०

 
औरंगाबादेत प्रतिक्विंटल ४०० ते २४०० रुपये 
औरंगाबाद : औरंगाबाद बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.११)औरंगाबाद बाजार समितीमध्ये कांद्याची ३६४ क्‍विंटल आवक झाली. या कांद्याला ४०० ते २४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.१०) कांद्याची ३०७ क्‍विंटल आवक होऊन दर ३०० ते २३०० रुपये प्रतिक्‍विंटल होते. २७ सप्टेंबरला ३५५ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला २०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २० सप्टेंबरला ४२४ क्‍विंटल आवक, तर दर ४०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल होते. १३ सप्टेंबरला ३६३ क्‍विंटल आवक होऊन ४०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६ सप्टेंबरला आवक २४० क्‍विंटल तर दर ३०० ते १९०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ७ सप्टेंबरला ६५८ क्‍विंटल आवक होऊन ४०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ९ सप्टेंबरला कांद्याची आवक २२८ क्‍विंटल तर दर २०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. 
   
जळगावात प्रतिक्विंटल १००० ते २६०० रुपये
जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.११) कांद्याची १६० क्विंटल आवक झाली. त्यास १००० ते २६०० व सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. या आठवड्यात कांद्याला बुधवारी सर्वाधिक दर मिळाला.

ज्या शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता. त्याची आवक सध्या होत आहे. दिवाळीपूर्वी कांद्याला दर अधिक मिळतील, असे संकेत बाजार समितीने दिले होते. 
महिनाभरापूर्वी कांद्याला सरासरी १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. त्यात हळूहळू वाढ झाली. मागील आठवड्यात सरासरी ११०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. आता सरासरी ५०० रुपये अधिक दर क्विंटलमागे मिळाला आहे. 

बाजार समितीतील आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये) 

दिनांक     आवक     किमान     कमाल     सरासरी
११ ऑक्‍टोबर   १६० १०००     २६००     १६००
४ ऑक्‍टोबर १६०     ९००     १६२५     ११००
२७ सप्टेंबर १५०     ९००     १५५०     ११००
२० सप्टेंबर  १४०     ८००     १३५०     १०००

      
परभणीत प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये
परभणी ः कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता.१२) कांद्याचे दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल होते, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये  आठवड्यातील प्रत्येक शनिवारी नाशिक, हैदराबाद आदी ठिकाणांहून आवक येत असते. शनिवारी (ता.७) कांद्याची ८०० क्विंटल आवक झाली होती. त्यास २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. शनिवारचेच दर आठवडाभर राहतात. गेल्या महिनाभरातील प्रत्येक शनिवारी सरासरी ८०० ते १२०० क्विंटल आवक झाली. त्यास १२०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. गेल्या आठवड्यापासून येथील मार्केटमध्ये कांद्याचे दर वाढले आहेत. गुरुवारी किरकोळ विक्री ३० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती, असे व्यापारी मो. शोएब अब्दुल नासेर बागवान यांनी सांगितले.

पुण्यात प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये
पुणे  ः पुणे बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१२) कांद्याची सुमारे ८० ट्रक आवक झाली हाेती, त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर हाेता. आवकेमध्ये नवीन कांद्याची सुमारे १५ तर जुन्या कांद्याची सुमारे ७० ट्रक आवक झाली हाेती. नवीन कांद्याला जुन्या कांद्यापेक्षा कमी दर असून, नवीन कांद्याला प्रतिदहा किलाे १५० ते २०० तर जुन्या कांद्याला २०० ते २५० रुपये दर असल्याचे सूत्रांनी सांगितले. हंगामात नवीन कांद्याची सरासरी ५० ते ६० ट्रक आवक असते. मात्र, पावसामुळे केवळ १० ते १५ ट्रक कांदा आवक हाेत अाहे. तर शेतकऱ्यांनी चाळींमध्ये साठवलेल्या जुन्या कांद्याची आवक चांगली हाेत असल्याने आणि जुन्या सुकलेल्या कांद्याला मागणी असल्याने दरात वाढ झाली असल्याचे बाजार समितीमधील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी सांगितले.

बाजार समितीतील आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)      

दिनांक     आवक     किमान     कमाल
३ सप्टेंबर १०,०५४      १२००     २०००
१० सप्टेंबर  १६,१४७      ८००     १८०० 
१७ सप्टेंबर   १०,९३०      ६००     १६०० 
२४ सप्टेंबर  १५,८६७      ८००     २०००

अकोल्यात प्रतिक्विंटल १६०० ते २८०० रुपये 
अकोला ः पावसामुळे कांद्याची आवक कमी झाली असल्याने येथील बाजारातील दर वधारलेले आहेत. नवीन कांद्याची आवक होऊ लागली असून, हा कांदा १६०० ते २००० रुपये क्विंटल, तर जुना कांदा २३००ते २८०० रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. 
गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने चढउतार सुरू होता. मात्र, मागील दहा ते पंधरा दिवसांपासून येथील बाजारात कांद्याचे दर स्थिर झाले आहेत. नगर जिल्ह्यातील नवीन कांद्याची या बाजारात आवक होत आहे. या कांद्याला १६०० ते २००० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे, तर जुन्या कांद्याची जिल्ह्यातूनच आवक होत असून, त्याची २३०० ते २८०० रुपयांदरम्यान विक्री हाेत आहे. दररोज दोन ते तीन गाडी कांदा आवक होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पाऊस ओसरल्यानंतर नवीन कांद्याची आवक वाढल्यानंतर दरांमध्ये घसरणीची शक्‍यता वर्तविली जात आहे.

सांगलीत प्रतिक्विंटल ५०० ते २८२९ रुपये 
सांगली ः येथील विष्णूअण्णा बाजार समितीत बुधवारी (ता. ११) कांद्याची आवक ४८१७ क्विंटल झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ५०० ते २८२९ रुपये दर मिळाला. बाजार समितीत गेल्या सप्ताहापेक्षा चालू सप्ताहात कांद्याच्या आवकीत वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. सातारा, पुणे, नगर जिल्ह्यांतून कांद्याची आवक होते. दिवाळीपूर्वी कांद्यास अपेक्षित दर मिळतो. यामुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा बाजारात विक्रीसाठी दाखल होतो आहे. गेल्या सप्ताहापेक्षा चालू सप्ताहात सरासरी ३०० रुपये दरात वाढ झाली असल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले.

बाजार समितीतील आवक व दर (प्रतिक्विंट/रुपये)  

दिनांक     आवक      किमान     कमाल
४ सप्टेंबर  २३०४     ७००     २२००
११ सप्टेंबर २२७८     ५००     १७००
१८ सप्टेंबर  १०५९     ५००     २०००
२५ सप्टेंबर   २९४६     ५००     २०००
९ ऑक्‍टोबर २४१३     ५००     ३०००
११ ऑक्‍टोबर  ४४१८     ५००     २८२९

   
 

इतर अॅग्रो विशेष
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...