agriculture news in marathi, onion MEP reduced to 150 dollar | Agrowon

कांदा निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपात
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपात केली आहे. आता कांदा निर्यातीसाठी किमान निर्यात मूल्य ७०० डॉलर असणार आहे. याआधी ते ८५० डॉलर होते. कपात केलेले निर्यात मूल्य हे २० फेब्रुवारीपर्यंत असणार आहे, अशी माहिती केंद्राने जारी केलेल्या परिपत्रकात दिली. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपात केली आहे. आता कांदा निर्यातीसाठी किमान निर्यात मूल्य ७०० डॉलर असणार आहे. याआधी ते ८५० डॉलर होते. कपात केलेले निर्यात मूल्य हे २० फेब्रुवारीपर्यंत असणार आहे, अशी माहिती केंद्राने जारी केलेल्या परिपत्रकात दिली. 

नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने दर प्रचंड वाढले होते. त्यामुळे देशातून निर्यात होणारा कांदा थांबवून किंमत नियंत्रित करण्यासाठी सरकारने २३ नोव्हेंबरला ३० डिसेंबरपर्यंत कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात ८५० डॉलरपर्यंत वाढ केली होती. त्यानंतर सरकारने त्यास २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर कर्नाटकात खरिपातील कांदा उत्पादनाला मोठा फटका बसला तसेच गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि आंध्र प्रदेशात पावसाने कांदा पिकाचे नुकसान केले. त्यामुळे देशातील बाजारामध्ये कांदा कमी येऊ लागला व तुटवडा निर्माण झाला.

सरकारने कांद्यावर किमान निर्यत मूल्य लावल्यानंतर घाऊक बाजारात चढे असलेले कांदा दर लगेच काही अंशी कमी झाले. महत्त्वाच्या काही किरकोळ बाजारपेठांमध्ये मागील सहा महिन्यांपासून कांदा दर दुपटीने वाढले होते. सध्या देशातील घाऊक बाजारात २७०० ते ३००० रुपये दर आहेत. हेच दर जुलै महिन्याच्या शेवटी ६०० रुपये होते.

केंद्राने एमईपी १५० डॉलरने हटवून ७०० डॉलरपर्यंत आणली आहे. ती या टप्प्यात ५०० डॉलरपर्यंत आणावी, अशी अपेक्षा होती. अजून एक महिन्याने आढावा घेतला जाणार आहे. सरकारची भूमिका सकारात्मकतेची दिसतेय. दरम्यान, चांगला पाठपुरावा झाल्यास येत्या काळात एमईपी काढली जाईल अशी अपेक्षा आहे.
- नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड

गुजरात व महाराष्ट्रात कांदा आवक वाढत आहे. येत्या काळात ती वाढतीच राहणार आहे. या स्थितीचा विचार करून ''एमईपी'' काढून टाकणे हे गरजेचे आहे, अन्यथा एप्रिलमध्ये कांद्याच्या किमती पडून शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल.
- चांगदेव होळकर, माजी वरिष्ठ संचालक, नाफेड

इतर अॅग्रो विशेष
पारंपरिक उत्साहात शिवजयंती साजरीपुणे : संपूर्ण महाराष्ट्रासह देश-विदेशात अनेक...
माजी आमदार जयंत ससाणे यांचे निधन नगर  :  कॉंगेसचे जिल्हाध्यक्ष माजी...
मराठवाड्याच्या तहानेवर इस्रायली उपाय!७००-८०० मि.मी पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यात...
जगणे सुसह्य करण्यासाठी जागे व्हाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शेती,...
‘महामेष’ योजना ३४ जिल्ह्यांत राबविणार...औरंगाबाद : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना...
शेतीतील यांत्रिकीकरणासाठी हवे शासनाचे...अकोला ः अाजच्या बदलत्या काळात शेती पद्धतीत...
मध्य प्रदेशात गारपीटग्रस्तांना हेक्टरी...नवी दिल्ली ः मध्य प्रदेश राज्यात नुकत्याच...
गारपीटग्रस्तांना भरीव मदतीचा प्रस्ताव...नागपूर ः गारपीटग्रस्तांना सरकारकडून जाहीर करण्यात...
शेतकरी कंपन्यांच्या धान्य खरेदीबाबत...पुणे : हमीभावाने धान्य खरेदीत शेतकरी उत्पादक...
महसूल मंडळातील सरासरी उत्पादकतेनुसार...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
गारपीटग्रस्त क्षेत्र तीन लाख हेक्टरमुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या...
राजधानी दिल्लीत शेती क्षेत्रावर आज...नवी दिल्ली : देशाला नवे कृषी धोरण देण्यासाठी...
‘कापूस ते कापड’पासून आता ‘पिकणे ते...नाशिक : राज्यातील कापसावर प्रक्रिया होऊन...
उन्हाचा चटका जाणवू लागलापुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी होऊ...
बचत, व्यवसायातून मिळवली आर्थिक सक्षमता गोऱ्हे बु. (ता. हवेली, जि. पुणे) गावामधील...
एकट्या मराठवाड्यातच २ लाख हेक्टरचे...औरंगाबाद : मराठवाड्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान...
विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः अजित...नगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा, महागाईचा...
राज्यातील पाच हजार सोसायट्यांचे...खामगाव, जि. बुलडाणा : राज्यात आगामी काळात ५०००...
पुढील चार दिवस हवामान कोरडे राहणारपुणे : राज्यावरील ढगाळ हवामानाचे सावट दूर...
विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः पवारनगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा,...