agriculture news in marathi, onion payment by cheque on same day from january in umrane market committee | Agrowon

उमराणे बाजार समितीत जानेवारीपासून ‘सेम डे’चा चेक
ज्ञानेश उगले
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

नाशिक : उमराणे बाजार समितीत काही व्यापाऱ्यांकडून होत असलेली शेतकऱ्यांची अडवणूक पूर्णपणे थांबविण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. नवीन वर्षाच्या प्रारंभापासून (१ जानेवारीपासून) शेतकऱ्यांना पुढील तारखेचा चेक देणे बंद होणार असून, असा प्रकार आढळल्यास संबंधित व्यापाऱ्याचा परवाना रद्द करून त्याचा व्यापार बंद करण्यात येणार आहे. याबाबतचे वृत्त बुधवारी (ता. २०) ‘ॲग्रोवन मध्ये प्रसिद्ध झाले होते.

नाशिक : उमराणे बाजार समितीत काही व्यापाऱ्यांकडून होत असलेली शेतकऱ्यांची अडवणूक पूर्णपणे थांबविण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. नवीन वर्षाच्या प्रारंभापासून (१ जानेवारीपासून) शेतकऱ्यांना पुढील तारखेचा चेक देणे बंद होणार असून, असा प्रकार आढळल्यास संबंधित व्यापाऱ्याचा परवाना रद्द करून त्याचा व्यापार बंद करण्यात येणार आहे. याबाबतचे वृत्त बुधवारी (ता. २०) ‘ॲग्रोवन मध्ये प्रसिद्ध झाले होते.

पुढील तारखेचा चेक देऊन शेतकऱ्यांचे पैसे महिनोंमहिने लटकवण्याचे प्रकार उमराणे बाजार समितीत घडत आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये व्यापाऱ्यांनी अडवून ठेवले आहेत. या पार्श्‍वभूमीवर यापुढील काळात शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे अडवणूक होणार नाही. अशी अडवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे उमराणे बाजार समितीने स्पष्ट केले आहे. बाजार समितीचे ५ कर्मचाऱ्यांचे विशेष पथक व्यवहारांवर बारीक नजर ठेवणार आहे. एखाद्या व्यापाऱ्याने दुसऱ्या दिवशीचा चेक जर दिला, तरी त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली जाणार असल्याचे बाजार समितीचे सभापती राजेंद्र देवरे यांनी सांगितले.

मार्चपर्यंत ‘आरटीजीएस’
उमराणे ही बाजार समिती ग्रामीण भागात असल्याने इथे ‘एसबीआय’ या राष्ट्रीयीकृत बॅंकेची एकच शाखा आहे. तरीही मार्च २०१८ पर्यंत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘आरटीजीएस द्वारे पैसे जमा होतील, या दृष्टीने आम्ही तयारी केली असल्याचेही देवरे यांनी सांगितले.

नोटाबंदीनंतर अडचणी वाढल्या
उमराणे बाजार समितीचे सचिव नितीन जाधव म्हणाले, की नोटाबंदीपूर्वी सर्वाधिक रोख पेमेंट करणारी अशी या बाजार समितीची ओळख राहिली आहे. अचानक झालेल्या नोटाबंदीनंतर बाजाराचे गणितच बिघडले; मात्र समितीच्या संचालकांकडून या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

बॅंकिंग सेवेचा अडथळा असल्याने तातडीने ‘आरटीजीएस’ शक्‍य नाही; मात्र चेकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विनाविलंब पेमेंट होणार आहे. व्यापाऱ्यांनीही याबाबत तयारी दाखवली आहे.
-राजेंद्र देवरे, सभापती, उमराणे बाजार समिती.

यापुढील काळात व्यवहारात अधिक शिस्त व पारदर्शकता आणण्यावर भर राहणार आहे. शेतकऱ्यांनी रीतसर बाजार समिती कार्यालयात तक्रारी कराव्यात. त्यांचा तत्काळ निपटारा केला जाईल.
-खंडू देवरे, संचालक- उमराणे बाजार समिती, अध्यक्ष- ओनियन मर्चंट असोसिएशन.

इतर अॅग्रो विशेष
कांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...
‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...
देशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...
स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...
कर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...
उजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर  : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...
बाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...
अवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...
विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...
समृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...
साखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची...पुणे: राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून...
कॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...
पिकातील लोह, जस्त, बोरॉन कमतरतेवरील...लोह (Fe) कार्ये ः हरितद्रव्ये निर्मितीचे (...
‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट...सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा...
पूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...
दुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर :  राज्यात यंदा...
पेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...
उसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...
राजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...