नगर जिल्ह्यात ३८ हजार हेक्‍टरवर कांदा लागवड

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर   ः जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळी स्थिती आहे. बाजारात कांद्याला दर नाही तरीही जिल्ह्यात कांद्याची बऱ्यापैकी लागवड होत असल्याचे चित्र आहे. रब्बीत आतापर्यंत सुमारे ३८ हजार ५९६ हेक्‍टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.

नगर जिल्ह्यामध्ये खरीप, लेट खरीप, रब्बी आणि उन्हाळी कांदा लागवड बऱ्यापैकी होत असते. यंदा बहुतांश भागात दुष्काळी स्थिती आहे. पाणी नसल्याने रब्बीतच पुरेशी कांदा लागवड करता आली नाही. रब्बीत तर पेरणीच झाली नाही. त्यामुळे अन्य पिकांप्रमाणे रब्बीत कांदा लागवडीवरही परिणाम होणार असल्याचे चित्र होते.

सध्या कृषी विभागाकडून सांगण्यात आलेल्या कांदा लागवड क्षेत्राचा विचार करता यंदा दरवर्षीच्या तुलनेत कांदा लागवडीचे क्षेत्र साधारण २० हजार हेक्‍टरने कमी झाले असले तरी आतापर्यंत रब्बीत झालेली कांदा लागवडीचे क्षेत्रही बऱ्यापैकी आहे. सध्या राज्यात कांद्याला अजिबात दर नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. गतवर्षीच्या उन्हाळ्यातील तसेच खरिपातील कांदाही काही शेतकऱ्यांकडे पडून आहे. असे असले तरी यंदाही कांदा लागवड बऱ्यापैकी होत आहे. सध्या दर नसला तरी भविष्यात दुष्काळामुळे कांद्याची वाणतूट होईल आणि चांगला दर मिळेल, या आशेनेच उपलब्ध असलेल्या पाण्यातून अन्य पिके घेण्याएवजी कांदा लागवड केली जात असल्याची स्थिती आहे.  

रब्बीत कांदा लागवड झालेले क्षेत्र ः नगर ः ६१३५, पारनेर ः ६९०३, श्रीगोंदा ः ९९६१, कर्जत ः १२१०, जामखेड ः ११३५, शेवगाव ः १३७२, पाथर्डी ः १७६३, नेवासा ः ११३१, राहुरी ः १७०१, संगमनेर ः १२५९, अकोले ः ८६७, कोपरगाव ः ३३८४, श्रीरामपूर ः ९१५, राहाता ः ८६०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com