agriculture news in marathi, onion plantation status in pune region, maharashtra | Agrowon

पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा लागवड
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार ३७० हेक्टरवर खरीप, लेट खरीप कांद्याची लागवड झाली आहे. येत्या काळात या लागवडीच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जून महिन्यापासून शेतकरी कांदा लागवडीची तयारी करतात. त्यासाठी नांगरट, रोपवाटिका, बियाणांची खरेदी करणे आदी बाबी मे - जून महिन्यात पूर्ण करतात. खरीप कांद्याची जून - जुलै, लेट खरीप कांद्याची सप्टेंबर - आॅक्टोबर तर उन्हाळी कांद्याची जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात लागवड केली जाते. बहुतांशी शेतकरी खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात कांद्याची लागवड करतात.

पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार ३७० हेक्टरवर खरीप, लेट खरीप कांद्याची लागवड झाली आहे. येत्या काळात या लागवडीच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जून महिन्यापासून शेतकरी कांदा लागवडीची तयारी करतात. त्यासाठी नांगरट, रोपवाटिका, बियाणांची खरेदी करणे आदी बाबी मे - जून महिन्यात पूर्ण करतात. खरीप कांद्याची जून - जुलै, लेट खरीप कांद्याची सप्टेंबर - आॅक्टोबर तर उन्हाळी कांद्याची जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात लागवड केली जाते. बहुतांशी शेतकरी खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात कांद्याची लागवड करतात.

पाऊस झाल्यानंतर जून-जुलैमध्ये खरीप कांदा लागवडीसाठी रोपवाटिका टाकली जाते. त्यानंतर साधारपणपणे एक ते सव्वा महिन्यात कांद्याची रोपे लागवडीस येतात. त्यानंतर बहुतांशी शेतकरी जुलै-आॅगस्ट महिन्यात कांदा लागवड करतात. लागवडीनंतर सुमारे साडेतीन ते चार महिन्यांनी कांद्याची काढणी केली जाते.

यंदा परतीचा पाऊस न झाल्याने पुणे विभागातील बहुतांशी तालुक्यांत आॅक्टोबरपासून पाणीटंचाई भासत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीची अपेक्षा सोडून दिली असून उपलब्ध पाण्यावर पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. सध्या बाजारात कांद्याला बऱ्यापैकी दर असले तरी पाणी टंचाईमुळे आगामी काळात कांद्याचे दर वाढण्याची अपेक्षा गृहीत धरून शेतकरी कांदा पिकाकडे वळू लागले आहेत.

पुणे जिल्ह्याच्या हवेली, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांचा पूर्व पट्टा, शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यात कांदा लागवड केली जाते. जिल्ह्यात सर्वाधिक कांदा लागवड शिरूर तालुक्यात होते. नगर जिल्ह्यात पारनेर, नगर, श्रीगोंदा, पाथर्डी, कर्जत या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात कांदा लागवडी झाल्या आहेत.

 

पुणे विभागात जिल्हानिहाय झालेली कांदा लागवड (हेक्टर)
जिल्हा कांदा लागवड क्षेत्र
नगर २९,३८०
पुणे  १४,०००
सोलापूर ४,९९०
एकूण  ४८,३७०

 

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : वाल, आंबा, काजू, नारळ,...वाल काढणी अवस्था वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा...
तेल्हारा, अकोट तालुक्यांत अवकाळी पाऊस;...अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ,...
अमरावती जिल्ह्यात सव्वालाख शेतकऱ्यांची...अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन...
माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ...कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम...
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक...परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग...
पुणे जिल्ह्यात ११५ गावे पितात दूषित पाणीपुणे ः जिल्ह्यातील ११५ गावे चक्क दूषित पाणी पित...
शेतकरी सन्मान निधी योजनेत नगर...नगर : शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळवून...
शेतीमाल तारण, ई नाम पुरस्कारांचे...पुणे: शेतीमाल तारण आणि आॅनलाइन राष्ट्रीय कृषी...
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...