agriculture news in marathi, onion plantation stop due to lack of rain, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड रखडली
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

कर्जत तालुक्‍यासह जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस नाही. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा कांदा लागवडही रखडली आहे. अनेक शेतकऱ्यांकडे रोपे आहेत, मात्र त्याचे काय करायचे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
- मनोहर लाडाणे, शेतकरी, डिकसळ, ता. कर्जत.

नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड रखडली आहे. खरिपात तर लागवड झाली नाहीच; पण आता लेट खरिपातही लागवड होण्याची शक्‍यता नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आता शेतातील रोपेही वाया जाऊ लागली आहेत.

जिल्ह्यामध्ये दरवर्षी खरीप आणि लेट खरिपात मिळून साधारण ६० हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांदा लागवड होत असते. गेल्या दोन वर्षांत कांद्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यंदा मात्र याउलट स्थिती आहे.

खरिपात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा निम्म्या क्षेत्रावरही कांदालागवड झालेली नाही. खरिपात चांगला पाऊस झाला की कांदा लागवड करता येईल यासाठी साधारण महिनाभर आधी रोपे टाकली जातात. यंदाही मोठ्या प्रमाणात रोपे टाकण्यात आली. मात्र खरिपाचा कालावधी संपला तरी पाऊस झाला नाही. आता सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये लेट खरिपाची लागवड सुरू होत असते, मात्र अजूनही पाऊस नाही. पाणीटंचाई वाढत असल्याने बाजारातही कांदा रोपांना मागणी नाही. त्यामुळे रोपांचे करायचे काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

संगमनेर तालुक्‍यात निमगाव जाळी हे गाव डाळिंब, कांदा पिकासाठी प्रसिद्ध आहे. अनियमित पाऊस व बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांनी पॉलिहाउसमधील शेतीचा मार्ग धरला. मात्र, उत्तरेकडील गोरक्षवाडी परिसरातील बहुतांश शेती जिरायती असल्याने तेथील शेतकऱ्यांना पावसावरच अवलंबून राहावे लागत आहे.

यंदा कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेने परिसरातील सुमारे ५०० एकरांवर कांदा लागवड झाली होती. मोसमी पावसाने हुलकावणी दिल्याने, निर्माण झालेल्या दुष्काळसदृश स्थितीत ५० टक्के पीक करपले. काही शेतकऱ्यांनी टॅंकरचे पाणी विकत घेऊन कांदा जगविण्याचा प्रयत्न केला; मात्र आता रोपे वाया जात आहेत. जामखेड, कर्जत, पारनेर, पाथर्डी शेवगाव, भागातही अशीच परिस्थिती आहे.  
 

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...