कांदारोपे - फुकट तरी न्या!

​शेतात कांदारोपे तयार होती. पाऊस नसल्याने पाणीपातळी घटली. रोपे जळून जाण्यापेक्षा फुकटात देण्याचा प्रयत्न केला. त्यालाही कोणी तयार नसल्याने अखेर शेतात पाळी घातली. - संजय तापकीर, शेतकरी, खांडवी
पावसाअभावी लागवड झाली नसल्याने कांद्याची रोपे आता जागेवरच जळू लागली आहेत.
पावसाअभावी लागवड झाली नसल्याने कांद्याची रोपे आता जागेवरच जळू लागली आहेत.

नगर : नगर जिल्ह्यामध्ये पाऊस नसल्याचा गंभीर परिणाम कांदा लागवडीवर झाल आहे. बहुतांश भागात पाण्याअभावी कांद्याच्या लागवडी रखडल्या आहेत. ही कांदारोपे आता अखेरच्या घटका मोजत आहेत. डोकेदुखी नको म्हणून शेतकऱ्यांनी ही रोपे फुकटात वाटायला सुरवात केली आहेत, मात्र फुकटातही कोणी रोपे नेत नसल्याची सध्याची स्थिती आहे. काही शेतकऱ्यांनी कांदारोपांवर पाळी फिरविली आहे. नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे क्षेत्र मोठे असते. यंदा मात्र पावसाअभावी कांदा लागवडीची पुरती वाट लागली आहे. गेल्या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी या पिकाला पसंती दिली. त्यासाठी जून-जुलैमध्येच शेतकऱ्यांनी तयारी केली होती. सुरवातीला तालुक्‍यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा बियाणे खरेदी केले. त्याची रोपे तयार करून लागवडीही झाल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत लागवडीचे क्षेत्र यंदा वाढेल असे वाटत होते मात्र पाऊस नसल्याचा गंभीर परिणाम कांदा लागवडीवर झाला आहे. नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगावसह दुष्काळी भाग असलेल्या पारनेर, कर्जत, जामखेड, पाथर्डी तालुक्‍यांतही अनेक भागांत कांद्यांची लागवड होऊ शकली नाही. शेतात उभी असलेली रोपे आता मोठी झाली आहे. परतीचाही पाऊस गेला. त्यामुळे आता पाऊस येण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे शेतातील रोपांची करायचे काय असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतातील रोपे जागेवर जळत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. रोपे वाया जाण्यापेक्षा विकलेली बरी, म्हणून रोपे विक्रीला काढली; मात्र पाऊस नसल्याने ग्राहक मिळेना. शेवटी ती फुकटात देऊनही कोणी घेईना, अशी स्थिती निर्माण झाली आहे. आता या पिकात उभी पाळी घालण्यात आली आहे. प्रतिक्रिया पाऊस लांबल्याने लाल कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र निम्म्याने घटले आहे. यंदा रब्बीच्या लागवडीही कमी होण्याची शक्‍यता आहे. - दीपक सुपेकर, तालुका कृषी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com