कळमणा बाजारात कांदा, बटाट्याची सर्वाधिक आवक

कळमणा बाजारात कांदा, बटाट्याची सर्वाधिक आवक

नागपूर ः येथील कळमणा बाजारात बुधवारी (ता. १३) कांद्याची तीन हजार क्‍विंटल, तर बटाट्याची २८०० क्‍विंटल अशी सर्वाधिक आवक नोंदविण्यात आली. लगतच्या मध्य प्रदेशातून बटाटा बाजारात पोचत दाखल होत असल्याने बटाटा आवक वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.  बुधवारी बाजारात गहू, तांदूळ, हरभरा, तूर, सोयाबीन, मोसंबीची आवक झाली. सरबती गव्हाची ९५ क्‍विंटल आवक झाल्याचे सांगण्यात आले. गव्हाचे दर २५०० ते २९०० रुपये प्रतिक्‍विंटल होते. लुचई तांदूळदेखील बाजारात जेमतेम ३० क्‍विंटल दाखल झाला. २२०० ते २५०० रुपये क्‍विंटलने तांदळाचे व्यवहार झाले. २८०० ते ३११२ रुपये क्‍विंटलने हरभऱ्याचे व्यवहार झाले. १३५३ क्‍विंटल इतकी हरभऱ्याची आवक झाल्याचे सांगण्यात आले. तुरीची १६३ क्‍विंटल आवक झाली. ३००० ते ३५२० रुपये क्‍विंटल असा तुरीचा दर होता. बाजारात सोयाबीनचीदेखील आवक होत असून, बुधवारी १६९ इतकी आवक नोंदविण्यात आली. ३००० ते ३२०० रुपये क्‍विंटल असा सोयाबीनचा दर होता. धनियाचे दर ३८०० ते ४००० रुपये क्‍विंटल होते. धनियाची आवक २६ क्‍विंटलची झाली. बाजारात मोसंबीची नियमित आवक असून, बुधवारी मोठ्या आकाराच्या मोसंबी फळांची १२६ क्‍विंटल इतकी आवक झाली. मोसंबीचे दर ३००० ते ३४०० रुपये क्‍विंटल होते. केळीची १३० क्‍विंटलची आवक झाली. केळीचे दर ४५० ते ५५० रुपये क्‍विंटलचे राहीले. ३५०० ते ४५०० रुपये क्‍विंटलने व्यवहार झालेल्या द्राक्षाची आवक ८० क्‍विंटलची झाली. तोतापल्ली आंब्याचे दर १५०० ते २००० रुपये क्‍विंटलचे होते. आवक १००० क्‍विंटलची झाली. बटाट्याचे दर १३०० ते १६०० रुपये क्‍विंटल तर आवक २८०९ क्‍विंटलची होती. पांढऱ्या कांद्याची सर्वाधिक ३००० किंवटलची आवक नोंदविण्यात आली. ६०० ते ८०० रुपये क्‍विंटलचा दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com