agriculture news in marathi, onion, potato highest incoming in Kalamna apmc | Agrowon

कळमणा बाजारात कांदा, बटाट्याची सर्वाधिक आवक
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 जून 2018

नागपूर ः येथील कळमणा बाजारात बुधवारी (ता. १३) कांद्याची तीन हजार क्‍विंटल, तर बटाट्याची २८०० क्‍विंटल अशी सर्वाधिक आवक नोंदविण्यात आली. लगतच्या मध्य प्रदेशातून बटाटा बाजारात पोचत दाखल होत असल्याने बटाटा आवक वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

नागपूर ः येथील कळमणा बाजारात बुधवारी (ता. १३) कांद्याची तीन हजार क्‍विंटल, तर बटाट्याची २८०० क्‍विंटल अशी सर्वाधिक आवक नोंदविण्यात आली. लगतच्या मध्य प्रदेशातून बटाटा बाजारात पोचत दाखल होत असल्याने बटाटा आवक वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

बुधवारी बाजारात गहू, तांदूळ, हरभरा, तूर, सोयाबीन, मोसंबीची आवक झाली. सरबती गव्हाची ९५ क्‍विंटल आवक झाल्याचे सांगण्यात आले. गव्हाचे दर २५०० ते २९०० रुपये प्रतिक्‍विंटल होते. लुचई तांदूळदेखील बाजारात जेमतेम ३० क्‍विंटल दाखल झाला. २२०० ते २५०० रुपये क्‍विंटलने तांदळाचे व्यवहार झाले. २८०० ते ३११२ रुपये क्‍विंटलने हरभऱ्याचे व्यवहार झाले. १३५३ क्‍विंटल इतकी हरभऱ्याची आवक झाल्याचे सांगण्यात आले. तुरीची १६३ क्‍विंटल आवक झाली.

३००० ते ३५२० रुपये क्‍विंटल असा तुरीचा दर होता. बाजारात सोयाबीनचीदेखील आवक होत असून, बुधवारी १६९ इतकी आवक नोंदविण्यात आली. ३००० ते ३२०० रुपये क्‍विंटल असा सोयाबीनचा दर होता. धनियाचे दर ३८०० ते ४००० रुपये क्‍विंटल होते. धनियाची आवक २६ क्‍विंटलची झाली. बाजारात मोसंबीची नियमित आवक असून, बुधवारी मोठ्या आकाराच्या मोसंबी फळांची १२६ क्‍विंटल इतकी आवक झाली.

मोसंबीचे दर ३००० ते ३४०० रुपये क्‍विंटल होते. केळीची १३० क्‍विंटलची आवक झाली. केळीचे दर ४५० ते ५५० रुपये क्‍विंटलचे राहीले. ३५०० ते ४५०० रुपये क्‍विंटलने व्यवहार झालेल्या द्राक्षाची आवक ८० क्‍विंटलची झाली. तोतापल्ली आंब्याचे दर १५०० ते २००० रुपये क्‍विंटलचे होते. आवक १००० क्‍विंटलची झाली. बटाट्याचे दर १३०० ते १६०० रुपये क्‍विंटल तर आवक २८०९ क्‍विंटलची होती. पांढऱ्या कांद्याची सर्वाधिक ३००० किंवटलची आवक नोंदविण्यात आली. ६०० ते ८०० रुपये क्‍विंटलचा दर होता.

इतर बाजारभाव बातम्या
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ६०० ते २०००...परभणीत ६०० ते १००० रुपये  परभणी...
जळगावात चवळी प्रतिक्विंटल ३५०० ते ४०००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
सांगलीत गुळाला प्रतिक्विंटल २८०० ते...सांगली : येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी-अधिक...
व्हॅलेंटाइन डे’निमित्त वाढली लाल...पुणे :‘व्हॅलेंटाइन ‘डे’ निमित्ताने लाल गुलाबांची...
शेवगा, ढोबळी मिरची, गाजराचे दर स्थिरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
औरंगाबादेत फ्लॉवर प्रतिक्विंटल ८०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात सोयाबीन, हरभरा, तुरीच्या...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात ढोबळी मिरची प्रतिक्विंटल ६५०...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
टोमॅटो, काकडी, हिरव्या मिरचीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ७००० ते १२६००...सांगली ः जिल्ह्यात हळद काढणी सुरू झाली आहे. नवीन...
अकोल्यात तुरीला प्रतिक्विंटल पाच हजार...अकोला ः येथील बाजार समितीत तुरीच्या अावकेत वाढ...
कळमणा बाजारात सोयाबीन दर ३७०० रुपयांवरनागपूर ः सुरवातीला २५०० ते २७०० इतका अत्यल्प दरात...
हिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील मार्केटयार्डाच्या बाजार...
राज्यात भेंडी प्रतिक्विंटल १४०० ते ५०००...सोलापुरात प्रतिक्विंटल ४५०० रुपये सोलापूर ः...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५०००...जळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
यवतमाळ बाजारात तुरीच्या आवकेत घटयवतमाळ : तूर दराच्या चढउतारानंतर बाजार समितीच्या...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
सोयाबीन दरात काही अंशी तेजीचा अंदाजनागपूर ः सोयाबीन दरात आलेली तेजी शेतकऱ्यांना...
नगर बाजारात तूर प्रतिक्विंटल ४४०० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक...
जळगावात चवळी, कारल्याचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...