पुण्यात कांदा, बटाटा, मटार, टोमॅटोचे दर वधारले

गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २५) कलिंगडाची झालेली आवक.
गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २५) कलिंगडाची झालेली आवक.

पुणे ः गेल्या आठवड्यात गुढीपाडव्यामुळे भाजीपाल्याची आवक या आठवड्यात काही प्रमाणात वाढली आहे. मात्र वाढता  उन्हाळ्यामुळे विविध शेतमालाचे घटलेले उत्पादनामुळे आवक सरासरी एवढीच असून, रविवारी (ता. २५) गुलटेकडी येथील पुणे कृषी बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या सुमारे १५० ट्रक आवक झाली हाेती. मात्र मागणी जास्त असल्याने बहुतांश भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली हाेती. यामध्ये कांदा, बटाटा, मटार, पावटा, टाेमॅटाे आदींचा समावेश आहे.  आवकेमध्ये परराज्यांतून सिमला येथून मटार सुमारे ३ ट्रक, राजस्थान येथून गाजर सुमारे ६ ट्रक, गुजरात आणि कर्नाटकातून काेबी सुमारे ४ ट्रक, गुजरात, मध्यप्रदेश आणि कर्नाटकातून हिरवी मिरची सुमारे १५ टेम्पाे, बंगलाेर येथून आले सुमारे १ टेम्पाे आणि आंध्रप्रदेश तामिळनाडु येथुन शेवगा सुमारे ६ टेम्पाे आवक झाली हाेती. कर्नाटकातून ताेतापुरी कैरी सुमारे ५ टेम्पाे, तर मध्यप्रदेश गुजरात येथून लसणाची सुमारे ४ हजार गाेणी आवक झाली हाेती. स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे ८०० गाेणी, टाेमॅटाे सुमारे ५ हजार क्रेट, हिरवी मिरची ४ टेम्पो, सिमला मिरची १२ टेम्पाे, काेबी व फ्लॉवर प्रत्येकी ८ ते १० टेम्पो, काकडी १० ते १२ टेम्पो, मटार ४०० गाेणी, पावटा ५ टेम्पाे, तांबडा भाेपळा १२ टेम्पाे, भेंडी ६ तर गवार ३ टेम्पाे, स्थानिक गाजर सुमारे ३०० गाेणी आवक झाली हाेती. तर कांदा सुमारे २०० ट्रक, आग्रा, इंदौर, गुजरात आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे ४५ ट्रक आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव कांदा : ८०-१००, बटाटा : १२०-१५०, लसूण : १५०-३०० आले : सातारी: ३४०-३५०, बेंगलोर : ३८०-४००, भेंडी : २००-३००, गवार : गावरान - सुरती ४००-५००, टोमॅटो : ५०-८०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : ६०-१२०, चवळी : १५०-२००, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी : १६०-१८०, पापडी : १६०-१८०, पडवळ : १८०-२००, फ्लॉवर : ६०-१००, कोबी : २०-४०, वांगी : ६०-१२०, डिंगरी : १६०-१८०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-१२०, शेवगा : १६०-२००, गाजर : स्थानिक ६०-८०, परराज्य. १००-१२०, वालवर : १८०-२००, बीट : ४०-८०, घेवडा : २००-३००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १६०-१८०, ढेमसे : १८०-२२०, भुईमूग : ३००-३५०, पावटा : ३००-३५०, मटार : स्थानिक ४५०-५००,परराज्य : ४००-४५०, तांबडा भोपळा : ६०-१००, चिंच अखंड ३००-३२०, फाेडलेली ६००-७००, सुरण : २५०-२६०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे दीड लाख, मेथीची सुमारे २५ हजार जुड्या आवक झाली हाेती. पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव कोथिंबीर : ३००-१०००, मेथी : ७००-१२००, शेपू : ५००-७००, कांदापात : ५००-८०० चाकवत : ५००-७००, करडई : ४००-५००, पुदिना : १००-२००, अंबाडी : ५००-६००, मुळे : ५००-८०० राजगिरा : ५००-७००, चुका : ५००-६००, चवळई : ५००-८००, पालक : ३००-४००. फळबाजार रविवारी (ता. २५) फळबाजारात संत्री २५ तर मोसंबी सुमारे ६० टन, डाळिंब सुमारे ३५ टन, पपई ८ टेम्पोे, लिंबे सुमारे ३ हजार गोणी, चिक्कू दीड हजार बॉक्स, पेरु सुमारे ६० क्रेट, कलिंगड ४० टेम्पाे, खरबुज २५ टेम्पाे, विविध द्राक्षांची सुमारे १५ टन आवक झाली हाेती. तर काेकणातून कच्च्या हापूस आंब्याची सुमारे दीड हजार पेट्यांची आवक झाली हाेती. उन्हाळ्यामुळे कलिंगड, खरबूज लिंबाच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने दरातदेखील वाढ झाली अाहे. तर द्राक्षांचा हंगाम संपत आला असून आवकदेखील कमी झाल्याने दरात वाढ झाली आहेे.

फळांचे दर  लिंबे (प्रति गोणी) : ६००-१०००, मोसंबी : (३ डझन) : २७०-४००, (४ डझन ) : १२०-२४०, संत्रा : (३ डझन) १८०-४००, (४ डझन) : १००-२००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१००, गणेश १०-३०, आरक्ता २०-४० कलिंगड : ५-१०, खरबुज : १०-२०, पपई : ५-२०, चिक्कू : (प्रति १० किलाे) १००-५००, पेरू (२० किलो) : ५००-६००, द्राक्षे : ताश ए गणेश (१५ किलो) ५५०-७५०, सुपर सोनाका (१५ किलो) : ८००-१२००, सोनाका (१५ किलो) : ८००-१०००. थाॅमसन (१५ किलाे) ५००-६५०, शरद (१५) ८००-१०००, आंबा हापूस ४ ते ८ डझन -२ ते  ३ हजार ५०० रुपये.

मटण मासळी शनिवार (ता. २४) चा उपवास आणि रविवारी (ता. २५) रामनवमी व एकादशी जोडून आल्याने मासळीची मागणी घटली हाेती. रविवारी (ता. २५) गणेश पेठेतील घाऊक मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी सुमारे ८ टन, खाडीची सुमारे दोनशे ते अडीशे  किलो, नदीची सुमारे पाचशे ते सहाशे टन आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला सिलनची सुमारे ९ टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.  खोल समुद्रातील मासळी  (प्रतिकिलोचे दर)   पापलेट : कापरी : १३००, मोठे : ११००-१२००, मध्यम : ९००-१०००, लहान :७००-८००, भिला : ५००-६००, हलवा : ४८०, सुरमई : ४००-६००, रावस-लहान : ५५०, मोठा : ७५०, घोळ : ५५०, करली : २४०-३६०, करंदी : २३०, भिंग : २८०, पाला : ५५०-११०, वाम : पिवळी २४० काळी ५५० ओले बोंबील : १२०-१४० कोळंबी ः लहान : २८०, मोठी : ४८०, जंबोप्रॉन्स : १३००, ,किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १३००, मोरी : १८०-२८०, मांदेली : १२०, राणीमासा : १६०-२००, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४८०. खाडीची मासळी : सौंदाळे : २४०, खापी : २४०, नगली : ३२०, तांबोशी : ४८०, पालू : २००, लेपा : १४०-२००, शेवटे : १८०, बांगडा : लहान : १२०, मोठे : १८०-२०० ,पेडवी : ५०, बेळुंजी : १००-१४०, तिसऱ्या : १८० खुबे : १६०, तारली : १२०  नदीची मासळी : रहू : १६०, कतला : १८०-२००, मरळ : ४००, शिवडा : १६०, चिलापी : ५०, मांगुर : १३०, खवली : १५० आम्ळी : ८० खेकडे : १६०, वाम : ५०० मटण : बोकडाचे : ४६०, बोल्हाईचे : ४६०, खिमा : ४६०, कलेजी : ४८०.  चिकन : चिकन : १३०, लेगपीस : १६०, जिवंत कोंबडी : १००, बोनलेस : २३०.  अंडी : गावरान : शेकडा : ६००, डझन : ८४ प्रति नग : ७. इंग्लिश : शेकडा : ३३० डझन : ४८ प्रतिनग : ४.

फुलबाजार फुलांचे प्रति किलोचे दर झेंडू : १०-४०, गुलछडी : १००-१५०, बिजली : १०-३०, कापरी : १०-३०, माेगरा ५००-६००, ऑस्टर : ८-१४, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : ८-१२, गुलछडी काडी : ३०-६०, डच गुलाब (२० नग) : २०-५०, लिलिबंडल : ५-१०, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : ५०-८०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com