agriculture news in marathi, onion price issue, dhule, maharashtra | Agrowon

आगाप कांद्याला अपेक्षित दर नसल्याने उत्पादन खर्चाबाबत शेतकरी साशंक
टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 मार्च 2018
कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द केले असले, तरी कांद्याचे दर वाढलेले नाहीत. शेतकऱ्यांना कमी दरात कांदा विकून मोठे नुकसान सहन करावे लागेल. फक्त खर्च निघेल, असे दर सध्या कांद्याला आहेत. 
- आत्माराम पाटील, शेतकरी, कापडणे, जि. धुळे.
धुळे  ः धुळे जिल्हा यंदा कांदा उत्पादनात अग्रेसर राहणार आहे; परंतु आगाप कांद्याला यंदा अपेक्षित दर नसल्यामुळे शेतकऱ्यांना हे पीक परवडेल की नाही, अशी भीती आहे. काही शेतकऱ्यांनी तर उत्पादन खर्चही निघतो की नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. 
 
धुळे जिल्ह्यातील शेतकरी कांदा उत्पादनासंबंधी नेटके व्यवस्थापन करून दर्जेदार कांदा घेऊ लागले आहेत. यंदा सूक्ष्मसिंचनाखालील कांदा क्षेत्र अधिक होते. धुळे तालुक्‍यातील कापडणे, न्याहळोद, देवभाने, नेर, कुसुंबा, चौगाव, जापोरे, साक्री तालुक्‍यातील पिंपळनेर, शिरपुरातील गिधाडे, तऱ्हाडी, बेगाव, शिंदखेडामधील टाकरखेडा, सुखवद आदी भागांत कांद्याची लागवड झाली होती.
 
सुमारे अडीच हजार हेक्‍टरवर धुळे जिल्ह्यात कांदा लागवड झाली होती. न्याहळोद भागात आगाप लागवडही काही शेतकऱ्यांनी केली. सूक्ष्म सिंचन व विद्राव्य खते असे चांगले व्यवस्थापनही अनेक शेतकऱ्यांनी केले. त्यासाठी जादा खर्च आला. 
 
बियाणे, मशागत, लागवड, तणनियंत्रण, फवारणी, विद्राव व इतर खते, खांडणी व इतर खर्च मिळून एकरी सुमारे ५० हजार रुपये खर्च कांदा पिकाला येत आहे; परंतु दर हवे तसे नाहीत. मागील १५ दिवस तर दरावर दबाव आहे. पांढऱ्या कांद्याला कमाल ६५० रुपये क्विंटलचा दर आहे. लाल कांद्याला ६०० ते १२०० रुपये क्विंटल, असे दर मागील दोन आठवड्यांपासून धुळे, पिंपळनेर बाजार समितीमध्ये आहेत.
 
अशी स्थिती असल्याने ज्या शेतकऱ्यांनी आगाप लागवड केली होती, त्यांनी आपला कांदा साठवायला सुरवात केली आहे. त्यासाठी श्रम व मजुरीवरील खर्च वाढला आहे; परंतु दर परवडणारे नसल्याने तो बाजारात विकून अधिक नुकसान होईल, त्यापेक्षा साठवणुकीची जोखीम स्वीकारणे, शेतकरी पसंत करीत आहेत.
 
यंदा पाऊस कमी होता; परंतु शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर दर्जेदार उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. सिंचनासाठी रात्री अपरात्री शेतकरी शेतात धावपळ करीत होते; परंतु दर अपेक्षित नसल्याने त्यांच्यात निराशा आहे.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...