सांगलीत कांदा प्रतिक्विंटल ५०० ते ४००० रुपये

कांदा
कांदा

सांगली ः येथील विष्णूअण्णा पाटील फळ व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात कांद्याची आवक वाढू लागली आहे. कांद्याची आवक ४६०३ क्विंटल झाली असून, त्यास ५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजार समितीत गुळाची ३०११ क्विंटल आवक झाली होती, त्यास ३६५० ते ४४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सोयाबीनची आवक २० क्विंटल झाली, त्यास ३०५० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. फळमार्केटमध्ये बटाट्याची ४३४ क्विंटल आवक होऊन त्यास ६०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. मोसंबीची ८५० डझन आवक झाली होती, तीस प्रतिदहा किलोस २०० ते ३०० रुपये असा दर मिळाला. डाळिंबाची आवक २३५० डझन झाली होती. त्यास प्रतिदहा किलोस २०० ते ३०० रुपये असा दर होता. सीताफळाची आवक १२५० डझन आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस ३० ते २०० रुपये असा दर मिळाला. सफरचंदाची आवक १९१८ पेटी झाली होती. त्यास प्रतिपेटीस १८०० ते २००० रुपये असा दर होता. पपईची आवक १०४ डझन झाली होती. त्यास प्रतिडझनास ५० ते १०० रुपये असा दर मिळाला. चिकूची ५० डझन आवक झाली होती. त्यास प्रतिदहा किलोस ५० ते १०० रुपये असा दर मिळाला. बाजार समितीतील शेतमालाची आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये)

शेतीमाल     आवक     किमान     कमाल
हरभरा     ४७     ४०००     ४५००
ज्वारी (हायब्रीड)  १५०     १७००     २०००
ज्वारी (शाळू)  ३१९     १८००     २५००
बाजरी     ५७     १४२५     १५००
गहू     ४५७     १९५०     २५००
तांदूळ     ९१३     २०००     ६०००
मसूर     १८     ५०००     ५२००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com