Agriculture News in Marathi, Onion prices are under pressure because reduction crop area, said Consumer Affairs Ministry, India | Agrowon

पीक क्षेत्र घटल्याने कांदा वधारला
वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली ः खरीपपूर्व हंगामातील पीक क्षेत्र २५ टक्क्यांनी कमी झाल्याने त्याचा परिणाम दरवाढीवर झाला अाहे; मात्र खरीप अाणि खरिपात उशिरा घेतलेले पीक चांगले अाल्याने कांदा उत्पादन वाढणे अपेक्षित अाहे, अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव अविनाश श्रीवास्तव यांनी दिली अाहे.

नवी दिल्ली ः खरीपपूर्व हंगामातील पीक क्षेत्र २५ टक्क्यांनी कमी झाल्याने त्याचा परिणाम दरवाढीवर झाला अाहे; मात्र खरीप अाणि खरिपात उशिरा घेतलेले पीक चांगले अाल्याने कांदा उत्पादन वाढणे अपेक्षित अाहे, अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव अविनाश श्रीवास्तव यांनी दिली अाहे.

कांदा अाणि टोमॅटोच्या दरवाढीवर ग्राहक व्यवहार मंत्रालयाने अनेक कारणे देण्यास सुरवात केली अाहे. दिल्लीत कांद्याचा दर प्रतिकिलो ५१ रुपये अाणि टोमॅटो ८० रुपयांवर पोचला अाहे. या पार्श्वभूमीवर ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनीही सध्याची कांदा, टोमॅटो दरवाढ हंगामी परिणामामुळे असून, नवीन पिकाची अावक सुरू झाल्यानंतर दरवाढीच्या स्थितीत सुधारणा होईल, असे म्हटले अाहे.

देशात सध्या कांद्याचे किरकोळ दर सरासरी प्रतिकिलो ३३ रुपये अाणि टोमॅटोचे दर ४५ रुपये अाहेत. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश अाणि अांध्र प्रदेशमध्ये खरिपातील कांद्याची अावक सुरू झाली अाहे. खरीपपूर्व हंगामातील अाणि खरिपातील कांद्याची बाजार समित्यांमध्ये अावक सुरू झाली अाहे. खरिपात उशिरा घेतलेल्या पिकाची जानेवारीमध्ये अावक होईल, असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव श्रीवास्तव यांनी सांगितले.

कनार्टकातून टोमॅटोची अावक थांबली

कर्नाटकात पावसामुळे टोमॅटो अावक होण्यास अडथळे निर्माण झाल्याने दिल्लीत टोमॅटोचे दर वाढले अाहेत. पुढील दहा-बारा दिवसांत टोमॅटाेचा पुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा सचिव श्रीवास्तव यांनी व्यक्त केली अाहे.

इतर ताज्या घडामोडी
पानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...
डॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....
दाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...
उपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...
आंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...
औरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
चुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...
ओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...
पुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे  : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर  : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे   ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...
नगरमध्ये मुगाचे क्षेत्र वाढतेय; पण...नगर  ः जिल्ह्यात खरिपात मुगाचे क्षेत्र...
सोलापूरातील अवघ्या ५० हजार शेतकऱ्यांना...सोलापूर  : कर्जमाफीची प्रक्रिया गेल्या काही...
डाळिंबाचा प्रतिकिलो दर २० ते २२ रुपयांवरसोलापूर ः राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
केरळला २० कोटींची मदत ः मुख्यमंत्री...मुंबई : केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या...
दूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना...सोलापूर : दूध व दुग्धजन्य पदार्थांची...
शेतकऱ्यांनो, संघटित होऊन संघर्ष करा :...आळेफाटा, जि. पुणे : ‘‘शेतकऱ्यांवर प्रत्येक...
पंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची...तिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि...
परभणीत फ्लॉवर प्रतिक्विंटल १००० ते १२००...परभणी  ः  येथील जुना मोंढा भागातील फळे-...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊसपुणे  : जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) सर्वदूर...