पिंपळगावला उच्चांकी आवकेनंतरही कांद्याचे दर टिकून

पिंपळगावला उच्चांकी आवकेनंतरही कांद्याचे दर टिकून

पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक  : आठवड्याच्या सुरवातीलाच सोमवारी (ता. १२) पिंपळगाव बसवंत बाजार समितीत २४ हजार क्विंटल इतकी कांद्याची विक्रमी आवक वाढल्याने बाजार आवारात सकाळपासूनच मालवाहतूक वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. इतर दिवसांच्या तुलनेत आवक वाढलेली असतानाही बाजारभाव मात्र स्थिर राहिले. त्यात कुठलीही घसरण झाली नाही.

मागील आठवड्यात बाजार समितीत कांद्याला सरासरी १८०१ रुपये बाजारभाव मिळाला होता. शनिवार, रविवार बाजार समित्या बंद होत्या. परिणामी, पिंपळगाव बाजार समितीत कांदा आवक वाढली. जोपूळ रोडवरील १०० एकर जागेत सध्या कांदा लिलाव केले जात आहे.

अचानक वाढलेली आवक लक्षात घेता जिथे टोमॅटो लिलाव व भाजीपाला लिलाव होतो तो भाग आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या जागेत ट्रॅक्टर, जीप लावण्यात आले होते. सकाळच्या लिलावासाठी १२५६ इतकी कांदा वाहतूक वाहने आली होती.

त्यापैकी ११०६ वाहनांमधून आणलेल्या कांद्याचा लिलाव करण्यात आला. सरासरी बाजारभाव १८५१ प्रतिक्‍विंटल होता. तर दुपारच्या लिलावात उर्वरित १५० वाहनांतील कांद्याचा लिलाव करण्यात आला. सोमवारी दिवसभरात सुमारे २४ हजार क्‍विंटल आवक झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com