कळवणला कांदा उत्पादकांचे ‘रास्ता रोको’

कळवण, जि. नाशिक : व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केल्यानंतर शनिवारी (ता.१६) कळवण बाजार समितीसमोर सर्वपक्षीय ‘रास्ता रोको’ करण्यात आले.
कळवण, जि. नाशिक : व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केल्यानंतर शनिवारी (ता.१६) कळवण बाजार समितीसमोर सर्वपक्षीय ‘रास्ता रोको’ करण्यात आले.

कळवण, जि. नाशिक : कांदाप्रश्‍नी शासनाच्या आडमुठी धोरणाचा निषेध करत कळवण बसस्थानकासमोर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

कांदा व्यापाऱ्यांवर आयकराच्या धाडी मारून आणि व्यापाऱ्यांवर दबाव वाढवून कांद्याचे भाव पाडण्यात आले. यात पुन्हा नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी मार्केट बंद करून शेतकऱ्यांना वेठीस धरले. यामुळे शेतकऱ्यांचा कांदा मोठ्या प्रमाणावर सडू लागला असून नुकसान होत आहे. शासनाच्या या आडमुठी धोरणाचा निषेध व कांदा मार्केट सुरळीत व्हावे, या मागणीसाठी शनिवारी (ता.१६) सकाळी १० वाजता कळवण बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यामुळे वाहतूक एक तास खोळंबली होती. या वेळी तहसीलदार यांना शिवसेनेकडून निवेदन देण्यात आले आहे. कांदाप्रश्‍नी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख जितेंद्र वाघ, संघटक संभाजी पवार, जिल्हाप्रमुख संजय रोदल, कक्ष शहरप्रमुख किशोर पवार, उपशहर प्रमुख विनोद मालपुरे, युवासेना, सचिन पगार, सुनील पगार, ललित आहेर, मुकुंद वाघ आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com