agriculture news in marathi, onion rate | Agrowon

कांदा दर अजून सव्वा महिना टिकून राहतील !
ज्ञानेश उगले
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

कांदा दरात क्विंटलला 200 च्या दरम्यान काही कारणांनी फरक पडू शकतो. मात्र बहुतांशी व्यवहार व दर स्थिर राहतील अशीच स्थिती आहे.
- बी. वाय. होळकर, सचिव, लासलगाव बाजार समिती

नाशिक : लासलगाव बाजार समितीत सोमवारी (ता.25) कांद्याला क्विंटलला 1200 ते 1700 व सरासरी 1500 रुपये दर मिळाले. हे दर अजून महिना, सव्वा महिना टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी तसेच तज्ज्ञांमधूनही व्यक्त होत आहे. मागील चार दिवसांपासून लासलगाव सह नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्या व 45 उपबाजारात कांद्याच्या दराचे हेच चित्र आहे.

साठेबंदी तसेच व्यापाऱ्यांवरील प्राप्तिकराच्या धाडी यामुळे गत पंधरवड्याच्या सुरवातीला बाजारात गोंधळ झाला. चार दिवस बाजार बंद राहिले. गत सप्ताहाच्या सुरवातीपासून पुन्हा कांदा लिलाव पूर्ववत सुरू झाले. याचा परिणाम होऊन दरात लगेचच 300 रुपयांनी घट झाली होती. मात्र त्यानंतर चार दिवसांनी बाजाराने जोम धरला.

कांदा दर क्विंटलला 1200 ते 1700 व सरासरी 1500 रुपयांवर स्थिरावले आहेत. ज्येष्ठ व्यापारी निर्यातदार नंदकिशोर डागा म्हणाले की, मागील वर्षी लासलगाव बाजार समितीत 600 ते 700 नग कांदा आवक होत होती. यंदा त्यात 300 नगांनी वाढ झाली आहे. वाढलेली आवक, परराज्यातील खरेदीदारांकडून स्थिरावलेली मागणी आणि साठेबंदी, धाडी टाकून शासनाकडून होत असलेला दबाव यामुळे व्यापार अडचणीत आला आहे.

याही स्थितीत येत्या काळातील मार्केट स्थिर राहील असा अंदाज आहे. नोव्हेंबर महिन्यात नवीन लाल कांद्यांची आवक वाढल्यास त्याचा बाजारावर परिणाम होईल. मात्र ऑक्‍टोबर महिन्यात दर स्थिर राहतील अशीच स्थिती आहे. व्यापारी व शेतकरी यांच्याकडील उपलब्ध कांद्याची स्थिती पाहता येत्या काळात आवक घटण्याची शक्‍यता नाही. कांदा दरात क्विंटलला 200 च्या दरम्यान काही कारणांनी फरक पडू शकतो. मात्र बहुतांशी व्यवहार व दर स्थिर राहतील अशीच स्थिती असल्याचे लासलगाव बाजार समितीचे सचिव बी. वाय. होळकर यांनी स्पष्ट केले.

इतर अॅग्रो विशेष
दोन आठवड्यांनंतर मॉन्सूनची प्रगती..पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
राज्यात दमदार पाऊस; कोकण, विदर्भात...पुणे : मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकण, मध्य...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १३९...
बाजारात कांदा टप्प्याटप्प्याने आणा..नाशिक : येत्या काळात देशभरातील कांदा बाजारात आवक...
दागिने गहाण टाकून पीककर्ज भरले...कोल्हापूर ः कारखान्यांनी एफआरपी देताना हात आखडता...
राज्यातील सोसायट्यांच्या दहा हजार...नाशिक : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत...
राज्यातील पाच नदी खोऱ्यांच्या जल...मुंबई : राज्यातील महत्त्वपूर्ण अशा कृष्णा,...
जमिनीची सुपीकता जपत वाढविले पीक उत्पादनकुडजे (ता. हवेली, जि. पुणे) येथील शुभांगी विनायक...
शिक्षण, जलसंधारणातून ग्रामविकासाला गतीमराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचा आरोग्य सेओवा,...
बॅंकेच्या चकरा अन् कागदपत्रांच्या...धुळे ः मागील दोन - तीन महिन्यांपासून पीककर्जासाठी...
‘ई-नाम’मधील १४५ बाजार समित्यांसाठी हवेत...पुणे ः शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल देशातंर्गत...
सुमारे साठ एकरांवर ‘ड्रीप अॅटोमेशन’पाणी व खतांचा काटेकोर वापर करण्याबाबत अनेक शेतकरी...
भारताकडून अमेरिकेच्या हरभरा, तुरीच्या...नवी दिल्ली ः अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या...
राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरीपुणे ः राज्यातील अनेक भागांत शुक्रवारी (ता. २२)...
माॅन्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थितीपुणे : माॅन्सूनला राज्यातून पुढे सरकण्यास अनुकूल...
राज्यात आजपासून प्लॅस्टिकबंदी...मुंबई : राज्य सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या...
धान्याला कीड लागताच सेन्सर देणार माहितीकऱ्हाड, जि. सातारा : साठवणूक केलेल्या ठिकाणी अथवा...
साखर निर्यातीचा कोटा ८० लाख टन करण्याची...कोल्हापूर : साखर निर्यातीची कोटा ८० लाख टन करावा...
सुकाणू समितीच्या कार्यकारिणीची जवळगाव...अंबाजोगाई, जि. बीड : शेतकरी संघटना व सुकाणू...
शेती म्हणजे तोटा हे सूत्र कधी बदलणार? शेती कायम तोट्यात कंटूर मार्करचे संशोधक व शेती...