बाजारात अफवा पसरवून कांदादर पाडण्याचा प्रकार

सद्यःस्थिती पाहता कांद्यावरील ‘एमईपी'चा कोणताही निर्णय सरकार घेईल याची शक्‍यता वाटत नाही. उन्हाळ कांदा व लाल कांद्याच्या उपलब्धतेबाबत कोणतीच अडचण नाही. येत्या काळात दर स्थिर राहतील, अशी स्थिती आहे. तरी येत्या काळात शेतकऱ्यांनी घाई न करता टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणणे योग्य राहील. - नानासाहेब पाटील, संचालक- नाफेड.
कांदादर
कांदादर

नाशिक : दसऱ्यानंतर कांदा बाजारात क्विंटलला चार हजारापर्यंतचा दर गेल्याने आवक मोठ्या प्रमाणात वाढली. परिणामी परराज्यांतील बाजारपेठेतील नेहमीच्या तुलनेत अधिक प्रमाणात कांदा पाठविण्यात आला. कर्नाटकातील बंगळूर, हुबळी, बेळगाव या महत्त्वाच्या बाजारांतही मागील तीन दिवसांपासून १६०० ट्रक माल अद्याप थोपवून राहिला. या मालाचा निपटारा हळूहळू होत आहे. या स्थितीचा परिणाम दरावर झाला. व्यापारी व शेतकरी या दोन्ही घटकांनी सावध भूमिका घेतली असून, मागील दोन दिवसांत कांद्याची आवक घटली आहे. त्यातच सरकारकडून ‘एमईपी’ लावण्याच्या हालचाली सुरू असल्याची अफवा पसरवून दर पाडण्याचे प्रकार घडत आहेत.  दोन दिवसांसाठी चार ते पाच हजारांपर्यंत गेलेले दर क्विंटलला दोन हजारांवर स्थिरावले आहेत. लासलगाव, पिंपळगाव बसवंत यासह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यात कांद्याला सोमवारी (ता.२२) ५०० ते २००० व सरासरी १५०० रुपये दर मिळाले. हा दर राहील, असे जाणकारांनी सांगितले. दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन लाल कांद्याच्या लिलावाचा शुभारंभ करताना काही बाजारात कांद्याला पाच हजार रुपयांपर्यंतचा उच्चांकी दर मिळाला. ही भाववाढ कृत्रिमरित्या केल्याचे आता समोर आले आहे. मात्र, त्याचा मोठाच फटका बाजाराला बसला. लाल कांद्याच्या स्वागतासाठी पहिल्या लिलावाला अचानक क्विंटलला पाच हजारांपर्यंत दर वाढविण्यात आले. काही व्यापाऱ्यांचे हे प्रयोग मात्र त्यांच्याच अंगाशी आल्याचे बोलले  दसऱ्याच्या लिलावात दर वाढल्यानंतर पुढील काही दिवस देशभरातील माध्यमांमधून कांद्याचे दर वाढल्याच्या चर्चांना ऊत आला. गुरुवार (ता.१८) नंतर पुढील तीन दिवस बाजार समित्यातील कांद्याच्या आवकेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याचा परिणाम दरावर होऊन सरासरी दरात ३०० ते ४०० रुपयांनी उतरण झाली. लाल कांद्याचा तुटवडा असून येत्या काळात त्याला चांगली दरवाढ मिळेल या कयासाने कांदा खरेदी केलेले कांदा व्यापारी मात्र दर उतरल्याने पुन्हा अडचणीत आले. परिणामी बाजारातील दर प्रतिक्विंटलला चार हजारांवरून दोन हजारांवर स्थिरावले. येत्या काळात ते स्थिर राहतील असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘एमईपी'ची अफवा सरकारकडून ‘एमईपी' लावण्याच्या संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी चर्चा शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये दबक्‍या आवाजात सुरू होती. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे जाणकारांनी स्पष्ट केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com