agriculture news in marathi, Onion rate increased due to short supply, Maharashtra | Agrowon

तुटवड्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा
वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

सध्या बाजारात कांद्याचा पुरवठा खूपच कमी झाला आहे. त्यामुळे घाऊक दरही वाढले आहेत. मागील दहा दिवसांत कांद्याचे दर ७ ते १० रुपयांनी वाढले आहेत. 
- राजेंद्र शर्मा, सचिव, कांदा आणि बटाटा व्यापारी संघटना, आझादपूर बाजार

नवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या कांदा उत्पादक राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याने त्याचा परिणाम कांदापुरवठ्यावर होत आहे. राजधानी दिल्लीत महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कांदा जातो. परंतु येथील बाजार समित्यांमध्ये कांदा आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. सध्या दिल्लीत कांद्याचे घाऊक दर २३ रुपये या दरम्यान आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

 बाजारात आवक कमी झाल्याने घाऊक दर वाढले आहेत. सध्या दिल्ली आणि परिसरात घाऊक दर २३ रुपये प्रतिकिलोच्या दरम्यान आहेत. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांनीही दर वाढवले आहेत. सध्या राजधानीत कांद्याचे किरकोळ दर ३० ते ४० रुपये प्रतिकिलोच्या दरम्यान आहेत. त्याचा भार सध्या ग्राहकांवर पडत आहे.
आझादपूर बाजारातील कांदा आणि बटाटा व्यापारी संघटनेचे सचिव राजेंद्र शर्मा म्हणाले, की मागील दहा दिवसांत बाजारात कांद्याच्या दरात जवळपास ७ ते १० रुपयांची वाढ झाली आहे.

बाजारात सध्या नव्या आणि जुन्या कांद्याच्या दरातील तफावत कमी झाली आहे. तसेच यंदा मॉन्सूनच्या काळात कांदाउत्पादक पट्ट्यातील अनेक भागात उशीर पाऊस झाल्याने लागवडी उशिरा झाल्या. त्यामुळे कांदाकाढणी अजून शेतकऱ्यांनी सुरू केली नाही. परिणामी खरिपातील कांदा अजून बाजारात आला नाही. त्याचा परिणाम आवकेवर झाला असून दरही वाढले आहेत. देशात महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बिहार, पंजाब आणि राजस्थान या राज्यांमध्ये कांद्याचे उत्पादन होते. 

महाराष्ट्रात उत्पादनाला फटका
आशियातील सर्वांत मोठ्या कांदा बाजारात सध्या कांदा आवक कमी झाली आहे. महाराष्ट्रात आॅक्टोबर हीट आणि दुष्काळी स्थितीमुळे उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे, तसेच नवीन कांदा अजून बाजारात आला नाही, त्यामुळे दर वाढून २१ ते २२ रुपये प्रतिकिलोदरम्यान आहेत. महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती कायम राहिल्यास कांदा उत्पादनात घट होऊन दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. लासलगाव बाजारात मागील वर्षी याच काळात कांद्याचे दर प्रतिकिलो १५ रुपयांदरम्यान होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
 

इतर अॅग्रो विशेष
वेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...
दूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
केळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...
सुगंधी वनस्पतींची शेती, तेलनिर्मितीही...नगर जिल्ह्यात आंभोळ या दुर्गम भागात मच्छिंद्र...
शेषरावांनी सुनियोजितपणे जपलेली संत्रा...टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव...
निर्यात कोट्यावरून साखर उद्योगात घमासानपुणे : देशात साखरेचा अफाट साठा तयार होत असताना...
शेतकऱ्यांचा जीवनसंघर्ष २०१८ मध्येही...मुंबई : गेल्या चार वर्षांत सिंचन सोडून कृषीच्या...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे : पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या...
हवामान बदलांमुळे दारिद्र्य वाढण्याचा...नवी दिल्ली : हवामानबदलांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे...
हिमवृष्टीमुळे काश्‍मीर, हिमाचल गारठले;...नवी दिल्ली : हिमवृष्टीमुळे काश्‍मिरसह हिमाचल...
‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...
प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकऱ्यांच्या...नाशिक : यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन...
शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यास अखेर...पुणे  ः गेल्या तीन वर्षांपासून बंद...
संत्रा निर्यातीला कृषी विभाग देणार...नागपूर : अपेडाने संत्रा क्‍लस्टरला पहिल्यांदाच...
विदर्भात गुरुवारपासून तुरळक पावसाचा...पुणे   : राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर...
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...