agriculture news in marathi, onion rate increases in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर वाढले
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

नाशिक : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्य शून्य केल्यानंतर लिलावाच्या पहिल्याच दिवशी कांद्याचा दर क्विंटलमागे १००० रुपयांनी वाढला. नाशिक जिल्हाभरातील विविध बाजार समित्यांमध्ये सोमवारी (ता.५) व मंगळवारी (ता.६) कांद्याचे दर क्विंटलमागे १५०० ते २५०० व सरासरी २००० रुपयांपर्यंत गेले. लाससलगाव बाजार समितीत क्विंटलमागे सरासरी २४५१ रुपयांचा सर्वाधिक भाव मिळाला. 

नाशिक : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्य शून्य केल्यानंतर लिलावाच्या पहिल्याच दिवशी कांद्याचा दर क्विंटलमागे १००० रुपयांनी वाढला. नाशिक जिल्हाभरातील विविध बाजार समित्यांमध्ये सोमवारी (ता.५) व मंगळवारी (ता.६) कांद्याचे दर क्विंटलमागे १५०० ते २५०० व सरासरी २००० रुपयांपर्यंत गेले. लाससलगाव बाजार समितीत क्विंटलमागे सरासरी २४५१ रुपयांचा सर्वाधिक भाव मिळाला. 

आठवडाभरापासून कांद्याच्या दरात घसरण होत होती. क्विंटलमागे दर २००० रुपयांवरून १४०० रुपयांपर्यंत घसरले होते. मात्र, केंद्राने निर्यातमूल्य शून्य केल्याने कांद्याने कमालीची उसळी घेतली आहे. जिल्ह्यात आता फक्त लाल कांदा शिल्लक असून, तोही आता संपत आला आहे. कांद्याची आवक कमी आणि निर्यात खुली यामुळे कांद्याने एकाच दिवसात १००० रुपयांनी उसळी घेतली. महिनाभरात उन्हाळ कांदाही मार्केटमध्ये यायला सुरवात होईल आणि निर्यातमूल्य शून्य केल्यामुळे कांद्याचे सरासरी दर १००० रुपयांच्या खाली येणार नाहीत, असे भाकीत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

पिंपळगाव बाजार समितीत झालेल्या लिलावात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी ४०० रुपयांनी कांदा वधारला होता. सोमवारी २१५१ रुपये सरासरी भाव मिळाला. लासलगाव बाजार समितीत शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत १४५१ रुपये भाव होता. क्विंटलमागे थेट २४५१ असा एक हजार रुपयांच्या उसळीने सोमवारी भाव वधारला. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सर्वाधिक सरासरी भाव हा लासलगाव मार्केटमध्ये मिळाला. जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, लासलगाव, उमराणा, सायखेडा, वणी, विंचूर, निफाड या बाजार समित्यांच्या आवारात सोमवारी एकूण ५४ हजार २९४ क्विंटल कांद्याची आवक झाली. कमीत कमी ९०० ते १५००, तर जास्तीत जास्त २३९९ ते २५३७ रुपये असा क्विंटलमागे भाव होता. 

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...