मुंबईत कांदा प्रतिक्विंटल २४०० ते ३३०० रुपये

कांदा
कांदा

मुंबई ः राज्यात परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतमालामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील खराब शेतमालाची आवक कमी झाली असून, शेतमालाची मागणी वाढल्याने शेतमालाचे दर वाढले आहेत. बाजार समितीतील शेतमालाची मंगळवारी (ता. ३१ )मार्केटमध्ये ५५० ट्रक भाजीपाला आवक झाली. कांद्याची कांदा १९११० क्विंटल आवक झाली होती, त्यास २४०० ते ३३०० व सरासरी २८५० रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजार समितीमध्ये लसणाची ३३६० क्विंटल आवक झाली होती, त्यास २६०० ते ४८०० व सरासरी ३७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बटाट्याची १२४०० क्विंटल आवक होऊन ६०० ते ११६० व सरासरी ८८० रुपये प्रतिक्विंटल दर होते. लिंबाची ७४१ क्विंटल आवक होऊन त्यास १३० ते १८० रुपये प्रतिशेकडा दर मिळाला. भुईमूग शेंगेची २५ क्विंटल आवक होऊन ३००० ते ४००० व सरासरी ३५०० रुपये दर मिळाले. आल्याची ११९९ क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल २८०० ते ३००० व सरासरी २९०० रुपये दर मिळाले. भेंडीची ४३१ क्विंटल आवक होऊन त्यास २५०० ते ३००० व सरासरी २८०० रुपये दर मिळाले. फ्लॉवरची ४३८० क्विंटल आवक झाली, त्यास १४०० ते १८०० व सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गवारची ३३७ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ३६०० व सरासरी ३३०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.  बाजार समितीतील शेतमालाची आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये) 

शेतमाल     आवक     किमान     कमाल     सरासरी
शेवगा      ९०     ८०००     ९०००     ८०००
टोमॅटो नं१ ६५८     ४५००     ५०००         ४७००
वांगी   ३३७     २८००     ३०००     २९००
वाटाणा      ९६६     ७०००     ८०००     ७५००
डाळिंब     ११६० ७५००     ७९००     ७७००
मोसंबी      ७५०     १५००     २८००     २१५०
पपई     २०३     १७५०     ३३००     २५२५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com