सोलापुरात कांद्याचे दर पुन्हा वधारलेलेच

कांदा
कांदा

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्याच्या दरात पुन्हा तेजी टिकून राहिली. कांद्याला सर्वाधिक ३५०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक रोज जेमतेम ७० ते ८० गाड्या झाली. या हंगामात एरव्ही हीच आवक १५० ते ३०० गाड्यांपर्यंत असते. पण यंदा त्यात मोठी घट झाली आहे. त्यात ही किरकोळ आवक वगळता, सगळी आवक बाहेरील जिल्ह्यातून आहे. दुसरीकडे कांद्याला मागणी मात्र वाढली आहे. त्यामुळे दरातील तेजी टिकून आहे, कांद्याच्या वाढत्या मागणीमुळे बाहेरील व्यापाऱ्यांची संख्याही वाढली आहे. आवक आणि मागणीतील ही तफावतच तेजीला पूरक ठरते आहे. कांद्याला प्रतिक्विंटल ३०० ते ३५०० व सरासरी १८०० रुपये इतका दर मिळाला. त्याशिवाय फळभाज्यांच्या दरात पुन्हा तेजी राहिली, त्यातही टोमॅटो, वांग्याला चांगला उठाव मिळाला. त्यांची आवक ही रोज ५० ते ७० क्विंटल पर्यंत राहिली. टोमॅटोला प्रतिदहा किलोसाठी २०० ते ३०० रुपये आणि वांग्याला १५० ते ४०० रुपये असा दर राहिला.  भाजीपाल्याचे दर ही पुन्हा स्थिर राहिले. भाज्यांची आवक मात्र रोज जेमतेम १० हजार पेंढ्यापर्यंत झाली. कोथिंबिरीला प्रति शंभर पेंढ्यासाठी ५०० ते ११०० रुपये, मेथीला ७०० ते १४०० रुपये आणि शेपूला ३०० ते ८०० रुपये असा दर मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com