agriculture news in Marathi, Onion rates increased again in Solapur, Maharashtra | Agrowon

सोलापूर बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा उसळी
सुदर्शन सुतार
मंगळवार, 23 जानेवारी 2018

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली. कांद्याची आवक मात्र जेमतेम राहिली. मागणी वाढल्याने दरातील तेजी टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक रोज ८० ते १०० गाड्यांपर्यंतच होत आहे. त्या आधीच्या सप्ताहात हीच आवक रोज २०० ते ३५० गाड्यांपर्यंत होती. जवळपास निम्याने आवकेत घट झाली आहे. कांद्याची सर्वाधिक आवक जिल्ह्यातूनच आहे. बाहेरील आवक तुलनेने खूपच कमी आहे.

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली. कांद्याची आवक मात्र जेमतेम राहिली. मागणी वाढल्याने दरातील तेजी टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक रोज ८० ते १०० गाड्यांपर्यंतच होत आहे. त्या आधीच्या सप्ताहात हीच आवक रोज २०० ते ३५० गाड्यांपर्यंत होती. जवळपास निम्याने आवकेत घट झाली आहे. कांद्याची सर्वाधिक आवक जिल्ह्यातूनच आहे. बाहेरील आवक तुलनेने खूपच कमी आहे.

येत्या पंधरवड्यात बीड, उस्मानाबाद, नगर भागातून आवक वाढण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे, पण असे असले तरी यंदा कांद्याची आवक कमी असल्योन दरातील तेजी आणखी काही दिवस टिकून राहणार असल्याचे सांगण्यात आले.

गतसप्ताहात बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते ३५०० व सरासरी २२०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय वांगी, गवार, भेंडी यांच्या दरातही हळूहळू सुधारणा होते आहे. वांग्याची आवक रोज १०० क्विंटल, गवारची २० क्विंटल, भेंडीची ३० क्विंटल इतकी झाली. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत त्यांच्या दरातील तेजीही काहीशी टिकून आहे. वांग्याला प्रतिदहा किलोसाठी १०० ते २०० रुपये, गवारला २०० ते ४०० रुपये आणि भेंडीला २५० ते ३०० रुपये असा दर मिळाला. 

भाजीपाल्याच्या दरात मात्र या सप्ताहातही पुन्हा चढ-उतार राहिला. भाज्यांची आवक दहा ते बारा हजार पेंढ्यांपर्यंत रोज राहिली. भाज्यांची सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी २०० ते ४०० रुपये, शेपूला १०० ते ३५० रुपये आणि कोथिंबिरीला १०० ते २५० रुपये असा दर मिळाला.  त्याशिवाय हिरवी मिरची, ढोबळी मिरचीचे दरही स्थिर राहिले. हिरव्या मिरचीला प्रतिदहा किलोसाठी १०० ते २०० रुपये आणि ढोबळी मिरचीला १५० ते २५० रुपये एवढा दर मिळाला. 

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...
शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील...सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद...
कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध...नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी...
'मतदान झालेल्या दुष्काळी भागात ...मुंबई  ः लोकसभेच्या मतदानाच्या तीन...
उच्चांकी मतदानामुळे कोल्हापूर मतदारसंघ...कोल्हापूर  : राज्याच्या तुलनेत कोल्हापूर...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...