सोलापुरात कांद्याच्या दरातील उठाव टिकून

कांदा
कांदा

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याचे दरातील तेजी पुन्हा टिकून राहिली. कांद्याची आवकही सातत्याने वाढते आहे, पण मागणी असल्याने कांद्याला उठाव मिळतो आहे, कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक ४००० रुपयांपर्यंतचा दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याची आवक रोज २०० ते ३०० गाड्यांपर्यंत होती. आवकेत सातत्याने चढ-उतार होता होता, पण सरासरी २०० गाड्यांपेक्षाही जास्तच आवक बाजारात होती. कांद्याची सगळी आवक स्थानिक भागासह नजीकच्या उस्मानाबाद, लातूर भगातूनही झाली. गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याची आवक आणि दर तेजीत आहेत. या सप्ताहातही पुन्हा कांद्याचे दर तेजीत आणि टिकून आहेत. या सप्ताहात कांद्याला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये इतका दर मिळाला. या सप्ताहात कमाल दरामध्ये आणखी २०० रुपयांनी वाढ झाली. त्याशिवाय भाजीपाल्याच्या दरात काहीशी सुधारणा झाली.  गेल्या महिनाभरापासून भाज्यांच्या दरात कमालीची घसरण झाली होती, या सप्ताहात त्यात सुधारणा झाली. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ४०० रुपये, कोथिंबिरीला ३५० रुपये आणि शेपूला ३०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय टोमॅटो, वांगी, बटाटे यांचे दरही काही प्रमाणात स्थिर राहिले. टोमॅटोची आवक रोज ३० क्विंटल, वांग्याची २५ क्विंटल आणि बटाट्याची १०० क्विंटल इतकी आवक झाली. टोमॅटोला प्रतिदहा किलोसाठी १५० ते २०० रुपये, वांग्याला १५० ते २५० रुपये आणि बटाट्याला १२० ते १५० रुपये असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com