सोलापुरात कांद्याचे दर वधारलेलेच

कांदा
कांदा

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्याच्या दरात पुन्हा तेजी टिकून राहिली. कांद्याला सर्वाधिक ४००० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  बाजार समितीच्या आवारात कांद्याची एरवी जेमतेम ८० ते १०० गाड्या असणारी आवक, या सप्ताहात २५० ते ३०० गाड्यांपर्यंत झाली, पण आवक वाढलेली असतानाही, उठाव चांगला असल्याने दरातील तेजी टिकून आहे, कांद्याची सगळी आवक स्थानिक भागासह बाहेरील जिल्ह्यातून राहिली, कांद्याच्या वाढत्या मागणीमुळे बाहेरील व्यापाऱ्यांची संख्याही वाढली आहे. आवक आणि मागणीतील ही तफावतच तेजीला पूरक ठरते आहे. कांद्याला प्रतिक्विंटल किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये इतका दर मिळाला. त्याशिवाय फळभाज्यांच्या दरात पुन्हा तेजी राहिली, त्यातही टोमॅटो, वांग्याला चांगला उठाव मिळाला. त्यांची आवक ही रोज ४० ते ५० क्विंटल पर्यंत राहिली. टोमॅटोला प्रतिदहा किलोसाठी १५० ते २५० रुपये आणि वांग्याला १५० ते ३५० रुपये असा दर राहिला. हिरवी मिरची, ढोबळी मिरचीचे दरही काहीसे स्थिर राहिले. हिरव्या मिरचीला प्रतिदहा किलोसाठी १०० ते २०० रुपये, ढोबळी मिरचीला १०० ते २२० रुपये असा दर मिळाला.  भाजीपाल्याच्या दरात मात्र या सप्ताहात काहीसा चढ-उतार झाला, भाज्यांची आवक मात्र रोज ८ ते १० हजार पेंढ्यापर्यंत झाली. कोथिंबिरीला प्रति शंभर पेंढ्यासाठी ४०० ते ५०० रुपये, मेथीला २०० ते ३०० रुपये आणि शेपूला २०० ते २५० रुपये असा दर मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com