वऱ्हाडात कांदा बीजोत्पादकांची फसगत
गोपाल हागे
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

अकोला : करार करूनही चुकारे देण्याची वेळ आली तेव्हा कंपन्या काढता पाय घेतात हा कांदा बीजोत्पादकांसाठी दरवर्षीचा अनुभव झाला आहे. या वर्षी तर कांद्याचे भाव कमी असल्याने २५ ते ४० हजारांदरम्यान करार झाले. शेतकऱ्यांनीही त्याला होकार दिला. मात्र, आता भाव कमी मिळत असल्याने या करारांबाबत विदारक वस्तुस्थिती समोर येऊ लागली आहे.

कांदा बीजोत्पादक शेतकरी व बियाणे खरेदी करणाऱ्या काही कंपन्या यांच्यात झालेल्या करारांबाबत शेतकऱ्यांकडे कुठलाही पुरावा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फसगत होत असल्याचे वऱ्हाडात चित्र आहे.

अकोला : करार करूनही चुकारे देण्याची वेळ आली तेव्हा कंपन्या काढता पाय घेतात हा कांदा बीजोत्पादकांसाठी दरवर्षीचा अनुभव झाला आहे. या वर्षी तर कांद्याचे भाव कमी असल्याने २५ ते ४० हजारांदरम्यान करार झाले. शेतकऱ्यांनीही त्याला होकार दिला. मात्र, आता भाव कमी मिळत असल्याने या करारांबाबत विदारक वस्तुस्थिती समोर येऊ लागली आहे.

कांदा बीजोत्पादक शेतकरी व बियाणे खरेदी करणाऱ्या काही कंपन्या यांच्यात झालेल्या करारांबाबत शेतकऱ्यांकडे कुठलाही पुरावा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फसगत होत असल्याचे वऱ्हाडात चित्र आहे.

दरवर्षी कांदा बियाण्यांचे भाव काय राहतील हे हंगामाच्या सुरवातीलाच स्पष्ट केले जाते. किमान एवढा भाव मिळेल याची खात्री देण्यात येते. विक्रीच्या वेळी बाजारभाव वाढला असेल तर ती तफावत दिली जाईल असेही तोंडी सांगितलेले असते. आता हे मध्यस्थ करार म्हणून सांगितलेली रक्कम मिळवून देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत.

कांदा बियाण्याची जर्मिनेशन पॉवर तपासली तर कमी आहे, बी चांगले नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचे बियाणे कंपन्यांनी परत पाठवले. त्यामुळे शेतकरी धास्तावले. आता हे शेतकरी एकीकडे हंगामापूर्वी केलेल्या करारानुसार विचारणा करीत असताना त्यांच्या हातात कुठलाही कागद नाही. कंपन्यांसाठी काम करणाऱ्या मध्यस्थांनी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या, कोरे चेक व बाँड आधीच घेतले आहे.

वाशीम जिल्ह्यात शासनाच्या एका सीड्स कॉर्पोरेशनच्या नावावर काही मध्यस्थांनी शेतकऱ्यांकडून बीजोत्पादन करून घेतल्याचे शेतकरी सांगत आहेत. परंतु गेल्या हंगामात अशा प्रकारचा कुठलाही बीजोत्पादन कार्यक्रम या भागात नव्हता असे अकोला येथील या कॉर्पोरेशनच्या विभागीय अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

शिवाय जर संबंधितांनी कॉर्पोरेशनकरिता इतर ठिकाणी संपर्क करून बीजोत्पादन घेतलेच असेल तर कॉर्पोरेशनकडून चुकाऱ्याचे कुठलेही धनादेश खासगी व्यक्तीच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिले जाऊ शकत नाहीत, असा दावा या अधिकाऱ्याने केला.
शासनाच्या धोरणानुसार चुकाऱ्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असती किंवा शासनाचे धनादेश राहले असते.

आता कुणालाही रोख किवा धनादेशाने चुकारे दिले जात नाहीत. हे सर्व लक्षात घेता कांदा बीजोत्पादकांसोबत मोठी बनवाबनवी झाल्याची शंका घेतली जाऊ लागले.
येत्या हंगामात तरी जागरूकता हवी.

लवकरच कांदा बीजोत्पादनाचा हंगाम सुरू होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांसोबत कराराच्या नावाखाली काही कंपन्या बनवाबनवी करीत असतात. मध्यस्थांना टारगेट देऊन या कंपन्या बीजोत्पादन करतात. बाजारात दर कमी झाले की हात वर करून मोकळ्या होतात.

भाव वाढले तर कराराची आठवण देत बियाणे नेतात. त्यांनी शेतकऱ्यांनी कंपन्यांसोबत करार करताना त्याची एक प्रत स्वतःजवळ ठेवणे गरजेचे  आहे. सध्या या कंपन्या एक कागदसुद्धा शेतकऱ्यांना देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना नंतर काहीही करता येत नसल्याची प्रकरणे वाढली आहेत.

वऱ्हाडात पाच हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कंपन्यांसाठी करार पद्धतीने बीजोत्पादन कार्यक्रम घेतले जातात. काही नामांकित कंपन्या सोडल्या तर दरवर्षी नव्याने दाखल होणाऱ्या कंपन्या व त्यांच्यासाठी काम करणाऱ्या मध्यस्थांनी त्यांची लूटच चालवली आहे.

करार ४० हजारांचा दिले १५ हजार
मेहकर तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने नामांकित कंपनीसोबत ४० हजार रुपये क्विंटल दराने करार केला होता. कंपनीने केवळ १५ हजारांचा दर दिला. ६ क्विंटल बियाण्याचे ९० हजार रुपये दिले. उर्वरित रक्कम कधी देणार याबाबत कुणीही बोलायला तयार नाही. आमच्या गावातील किमान ५० लाखांपेक्षा अधिक रक्कम या कंपनीकडे शिल्लक राहल्याची आपबीती या शेतकऱ्याने सांगितली.

इतर बातम्या
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
उत्पादन, उत्पन्नवाढीसाठी गटशेतीची कास...देळेगव्हाण, जि. जालना  : शेती क्षेत्र घटत...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
वऱ्हाडातील प्रकल्पांची ‘तहान’ कायमअकोला  ः दिवाळीचे पर्व सुरू झाले; मात्र या...
नाफेडच्या खरेदी केंद्रांवर सोयाबीनला '...परभणी : नाफेडमार्फत आधारभूत किंमत खरेदी...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...