Agriculture News in Marathi, onion seed rate down, Akola, Buldhana, Washim districts | Agrowon

वऱ्हाडात कांदा बीजोत्पादन अडचणीत
टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

अकोला ः दरवर्षी वऱ्हाडात कांदा बीजोत्पादनाचे क्षेत्र वाढत असताना या हंगामात मात्र ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली अाहे. मागील हंगामात उत्पादित केलेले बियाणेच अद्याप अनेक शेतकऱ्यांकडे पडून अाहे. शिवाय कंपन्यांनी करार करताना सांगितलेले दरही न दिल्याने कांदा बीजोत्पादक दुसऱ्या पिकांकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली अाहे.

अकोला ः दरवर्षी वऱ्हाडात कांदा बीजोत्पादनाचे क्षेत्र वाढत असताना या हंगामात मात्र ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली अाहे. मागील हंगामात उत्पादित केलेले बियाणेच अद्याप अनेक शेतकऱ्यांकडे पडून अाहे. शिवाय कंपन्यांनी करार करताना सांगितलेले दरही न दिल्याने कांदा बीजोत्पादक दुसऱ्या पिकांकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली अाहे.

रब्बी हंगामात दरवर्षी बुलडाणा, अकोला, वाशीम या तीनही जिल्ह्यांमध्ये कांदा बीजोत्पादन केले जाते. वऱ्हाडातील या जिल्ह्यांमध्ये सुमारे पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र राहते. या वर्षी सध्या कांद्याचे दर वाढलेले असून, लागवडीच्या कांद्याच्या दरांना या तेजीचा फटका बसला अाहे.

त्यातच मागील हंगामात उत्पादित केलेले बियाणे काही कंपन्यांनी अवघे १० ते ११ हजार रुपये क्विंटलपासून खरेदीची तयारी दाखवली. विशेष म्हणजे पेरणीच्यावेळी २० ते २५ हजारांदरम्यान करार झाला होता. शिवाय बियाणे खरेदीच्या काळात दर वाढलेले असल्याचे बोनसही दिले जाईल, असे सांगण्यात अाले. परंतु बियाणे तयार झाल्यानंतर बाजारात कांद्याचे दर कोसळले होते. त्यामुळे काही कंपन्यांनी थेट करारच मोडीत काढले होते.

कंपन्यांसाठी काम करणाऱ्या मध्यस्थांनी हात वर केले. काही शेतकऱ्यांकडून बियाणे उचलले मात्र त्यांना बियाण्याची उगवणक्षमता तपासणी केल्यावर दर ठरवू असे सांगितले. काहींनी स्वतःच्या खात्याचे धनादेश व एक ते दीड महिन्यांचा कालावधी घेऊन शेतकऱ्यांचे हिशेब केले.

मागील हंगामात कधी नव्हे इतके वाईट अनुभव कांदा बीजोत्पदकांनी सहन केले. अाजही अनेक शेतकऱ्यांकडे कांदा बियाणे तसेच पडून अाले. लावलेला खर्चसुद्धा त्यांना निघालेला नाही. या सर्व बाबींचा विचार करता कांदा बीजोत्पादनाचे क्षेत्र सुमारे २५ ते ४० टक्क्यांनी कमी होऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे अाहे.

कंपन्यांकडून अद्याप दर जाहीर नाहीत
कमी पावसामुळे भविष्यात पिकाला द्यायला पाणी राहील की नाही याचीही शाश्वती नसल्याने शेतकरी सध्या महागडे बनलेला लागवडीचा कांदा खरेदी करण्यास मागेपुढे पाहत अाहेत. त्यातच कंपन्यांनी अद्यापही त्यांचे दर जाहीर केलेले नाही.

नामांकीत कंपन्या करार करण्यासाठी अद्यापही पुढे अालेल्या नाहीत. या सर्व लक्षात घेता कांदा बिजोत्पादनाला या हंगामात ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता अाहे. यामुळे कांदा बिजोत्पादनाएेवजी हरभरा व इतर रब्बी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसत अाहे.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...