agriculture news in Marathi, Onion sowing increased in Shirur tahsil, Maharashtra | Agrowon

कांदा लागवडीत शिरूरची बाजी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 जानेवारी 2018

पुणे ः कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवडी केल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक लागवड शिरूर तालुक्यात झाली आहे. त्यामुळे कांदा लागवडीत शिरूर तालुका जिल्ह्यात मुख्य आगार म्हणून पुढे येत आहे. सध्या रब्बी हंगामात कांद्याची लागवड वेगाने सुरू आहे. जिल्ह्यात ४३ हजार ५७० हेक्टरपैकी एकट्या शिरूरमध्ये १३ हजार ६४० हेक्टरवर लागवड झाली आहे.

पुणे ः कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवडी केल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक लागवड शिरूर तालुक्यात झाली आहे. त्यामुळे कांदा लागवडीत शिरूर तालुका जिल्ह्यात मुख्य आगार म्हणून पुढे येत आहे. सध्या रब्बी हंगामात कांद्याची लागवड वेगाने सुरू आहे. जिल्ह्यात ४३ हजार ५७० हेक्टरपैकी एकट्या शिरूरमध्ये १३ हजार ६४० हेक्टरवर लागवड झाली आहे.

जिल्ह्यातील पूर्वेकडील शिरूर, खेड, बारामती, पुरंदर, दौंड या तालुक्यात दरवर्षी कमी पाऊस पडतो. त्यामुळे बहुतांशी शेतकरी कमी कालावधीची व शाश्वत उत्पन्न देणारी पिके घेत आहेत. रब्बी हंगामात अनेक शेतकरी गहू पिकाएेवजी कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. त्यामुळे शिरूर, खेड, बारामती, पुरंदर, दौंड हे तालुके कांदा लागवडीसाठी प्रसिद्ध झाले आहेत.

या भागातील सर्वाधिक लागवड शिरूर तालक्यात होते. गेल्या काही दिवसांपासून कांद्याला चांगले दर असल्याने तालुक्यातील शेतकरी कांदा लागवडीकडे वळू लागले आहेत. तालुक्यातील टाकळीहाजी, पिंपरखेड, काठापूर, मांडवगण, तांदळी, गणेगाव, बाभूळसर, पिपळसुपी, जांबूत, वडनेर, कौठे, कान्हूर, चिंचोरी ही गावे कांदा लागवडीचे मुख्य आगार म्हणून ओळखली जातात. यंदाही या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवडी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

दरवर्षी खरीप, लेट खरीप (रांगडा कांदा) आणि रब्बी हंगामात (उन्हाळी कांदा) कांद्याची लागवड होते. बहुतांशी शेतकरी रब्बी हंगामातील कांद्याला अधिक प्राधान्य देतात. खरीप हंगामातील कांद्याची आॅगस्टमध्ये लागवड होते. लेट खरीप हंगातील कांद्याची सप्टेंबर ते आॅक्टोबर या महिन्यात लागवड करतात. उन्हाळी कांद्याची डिसेंबर, जानेवारी महिन्यात लागवड होते.

त्यासाठी बहुतांशी शेतकरी एक ते दीड महिना अगोदर गादीवाफ्यावर रोपे तयार करून त्यानंतर लागवड करतात. 
लागवड केलेल्या कांद्याची साधारणपणे साडेतीन ते चार महिन्यांनी काढणी होते. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळतो; परंतु काही शेतकरी कांद्याची साठवणूक करतात. चांगला भाव आल्यानंतर त्याची विक्री करतात. परिणामी शेतकऱ्यांना हंगामात भेटणाऱ्या दरापेक्षा अधिक दर नंतरच्या कालावधीत मिळतो. तसेच या भागात हवामान पोषक असल्याने अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवडी करतात, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

तालुकानिहाय झालेली कांदा लागवड ः (क्षेत्र, हेक्टरमध्ये)
हवेली १९००, मुळशी १८०, भोर ४९०, मावळ २००, वेल्हा ३०, जुन्नर ६१५०, खेड ५७००, आंबेगाव ३१५०, शिरूर १३६४०, बारामती ३५८०, इंदापूर ५६०, दौंड ३७८०, पुरंदर ४२१०

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...