नाशिकला कांदा ५०० ते ६५० रुपये

नाशिकला कांदा ५०० ते ६५० रुपये
नाशिकला कांदा ५०० ते ६५० रुपये

नाशिक : गेल्या आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी ५०० ते ६५० असे दर मिळत आहे. सध्या उन्हाळ कांद्याची मार्केटमध्ये आवक असून अपेक्षेप्रमाणे भाव नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. लग्नसराई संपल्यानंतर बाजार समित्यांमध्ये कांदा आवक वाढेल, अशी शक्यता बाजार समिती सूत्रांनी व्यक्त केली आहे.  शेतकऱ्यांकडील लाल कांदा संपला असून आता फक्त उन्हाळ कांद्याचीच आवक नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह सर्वच बाजार समितीत होत आहे. लग्नसराई सुरू असल्याने काही प्रमाणात आवक मंदावली असली, तरीही भाव मात्र गेल्या १५ ते २० दिवसापासून स्थिर आहेत. जिल्ह्यात लासलगाव आणि पिंपळगाव या दोन बाजार समितीत कांद्याची आवक मात्र टिकून आहे. रोज २५ ते ३० हजार क्विंटलची आवक या ठिकाणी होत आहे.

मंगळवार(ता. ८)ची आवक (क्विंटलमध्ये)

पिंपळगाव २४ हजार ९७५
लासलगाव १४ हजार ६६०
उमराणे २० हजार
चांदवड १५ हजार ७००
सायखेडा ४६००
विंचूर ७ हजार
दिंडोरी २५००
निफाड २६९१

उत्पादकांचा साठवणुकीवर भर नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याला मंगळवारी (ता. ८) कमीत कमी ३००, जास्तीत जास्त ९६१ (पिंपळगाव बाजार समिती) व सरासरी ६२५ ते ६७५ रुपये असा दर होता. लासलगाव येथे नाफेडने ३२५ क्विंटल कांदा खरेदी केला, ८०० रुपये किमान, जास्तीत जास्त ८७५ रुपये तर सरासरी ८२० रुपये प्रति क्विंटलला भाव नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याला होते. उन्हाळ कांदा हा टिकायला चांगला असल्याने बहुतेक शेतकऱ्यांचा कांदा साठवणुकीकडे कल आहे. कांदा चाळींमधे कांदा साठवण्याचे काम काही शेतकरी करीत आहेत. तर काही ठिकाणी अजूनही शेतातील उन्हाळ कांद्याची काढणी सुरू आहे. १५ मेपर्यंत लग्नसराई असल्याने कांदा आवक कमी असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com