agriculture news in marathi, onion storage plants, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात ११ हजार कांदा चाळींची उभारणी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 मार्च 2018
यंदा मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली आहे. एकाच वेळी हा कांदा बाजारात आणल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होईल. मात्र शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवणूक करून टप्प्याटप्प्याने कांदा विक्री केल्यास चांगला दर मिळेल. त्यामुळे नुकसान होणार नसून कांद्यातून 
चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होईल. 
- बी. जे. पलघडमल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे
पुणे  ः कांद्याचे अधिक उत्पादन झाल्यास शेतकऱ्यांना कमी दर मिळून मोठे नुकसान होते. हे होऊ नये म्हणून शासनाने कांदा चाळी उभारणीवर गेल्या काही वर्षांपासून भर दिला आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ११ हजार २९९ कांदा चाळी उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे जवळपास दोन लाख दोन हजार ८५० मेट्रिक टन कांदा साठवणूक क्षमता तयार झाली आहे. योग्य दर असताना या शेतकऱ्यांना कांदा विक्री करणे शक्‍य होणार आहे. 
 
यंदा जिल्ह्यात रब्बी हंगामात सुमारे ८५ हजार ६०१ शेतकऱ्यांनी ५० हजार ५७३ हेक्‍टरवर कांदा लागवड केली आहे. त्यामुळे येत्या एक ते दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. यंदाही कृषी विभागाने सुमारे साडेचारशे ते पाचशे कांदा चाळीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ११ हजार २९९ कांदा चाळी उभ्या राहिल्या आहेत.
 
त्यामध्ये शासनाच्या माध्यमातून ३५७९ कांदा चाळी उभारण्यात आल्या असून त्यांची साठवणूक क्षमता ७१ हजार ७०७ मेट्रिक टन एवढी आहे. खासगी माध्यमातून ७७२१ कांदा चाळी उभारण्यात आल्या आहेत. त्याची साठवणूक क्षमता ही एक लाख ३१ हजार ३७८ मेट्रिक टन एवढी आहे. 
 
 आंबेगाव तालुक्‍यात सर्वाधिक कांदा लागवड झाली आहे. तालुक्‍यात सुमारे ९५७० शेतकऱ्यांनी ५५४५ हेक्‍टरवर कांद्याची लागवड केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन आंबेगाव तालुक्‍यात होणार आहे. कांद्याची साठवणूक करण्यासाठी आत्तापर्यंत तालुक्‍यात सुमारे ३९०५ कांदा चाळी उभारण्यात आल्या असून त्याची क्षमता ६० हजार ४११ टन एवढी आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...