agriculture news in marathi, onion variety | Agrowon

कांद्याच्या नवीन संशोधित वाणाला ६ महिन्यांपासून मान्यतेची प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

नाशिक : चितेगाव फाटा येथील राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन तथा विकास प्रतिष्ठानतर्फे संशोधित केलेल्या कांद्याचे नवीन वाण केंद्रीय समितीच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. प्रतिष्ठानने एल-८१९ वाणाचा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी समितीला पाठवला आहे. वाणाला मान्यता मिळाल्यानंतर त्याच्या बिजोत्पादनाची प्रक्रिया सुरू होऊन शेतकऱ्यांच्या हातात नवीन वाणाचे बियाणे पोचेपर्यंत किमान वर्षभराचा कालावधी अपेक्षित आहे.

नाशिक : चितेगाव फाटा येथील राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन तथा विकास प्रतिष्ठानतर्फे संशोधित केलेल्या कांद्याचे नवीन वाण केंद्रीय समितीच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. प्रतिष्ठानने एल-८१९ वाणाचा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी समितीला पाठवला आहे. वाणाला मान्यता मिळाल्यानंतर त्याच्या बिजोत्पादनाची प्रक्रिया सुरू होऊन शेतकऱ्यांच्या हातात नवीन वाणाचे बियाणे पोचेपर्यंत किमान वर्षभराचा कालावधी अपेक्षित आहे.

एकरी १६० क्विंटलच्या आसपास उत्पादन मिळेल अशा लाल ४- एल ७४४ वाणाचे प्रतिष्ठानतर्फे बिजोत्पादन सुरू करण्यात आले आहे. बिजोत्पादन करार पद्धतीने शेतकऱ्यांकडून करून घेण्यात येत आहे. महाराष्ट्रातील बिजोत्पादनातून उपलब्ध होणारे या वाणाचे बियाणे राज्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात मिळणार आहे. यंदा कमी प्रमाणात नवीन वाणाचे बियाणे उपलब्ध होणार असून पुढील वर्षापासून बियाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल, असे प्रतिष्ठानच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. प्रतिष्ठानतर्फे इतर वाणाचे बिजोत्पादन महाराष्ट्राबरोबर गुजरात, मध्य प्रदेशात केले जाते. 

चीनपाठोपाठ भारतात उत्पादन
चीनच्या पाठोपाठ भारतामध्ये कांद्याचे उत्पादन ९ लाख ५९ हजार हेक्‍टरवर घेतले जाते. १ कोटी ६३ लाख ९ हजार टनापर्यंत उत्पादन होते. भारतातून घरगुती वापर पूर्ण होऊन १३ ते १५ लाख टन कांद्याची निर्यात होते. ही निर्यात ३ हजार कोटींपर्यंत होते. भारतामध्ये हेक्‍टरी १७.०१ टन कांद्याची उत्पादकता आहे. मात्र ही उत्पादकता अमेरिका आणि चीनच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामागे कमी कालावधीत वाणांचे कमी उत्पादक क्षमता, बरेचसे वाण कीड-रोगांसाठी संवेदनशील, काढणी पश्‍च्यात होणारे नुकसान अशी सारी कारणे त्यामागे आहेत. या समस्यांच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिष्ठानने गेल्या वर्षी लाल ४- एल ७४४ वाण खरीप आणि रब्बी हंगामासाठी शिफारस केली आहे. ७ ते ८ किलो बियाणे एकरासाठी पुरेसे ठरते आणि लागवडीनंतर सर्वसाधारणपणे चार महिन्यांत कांदा काढणीला येतो. गोल आणि गडद लाल रंगाचा हा कांदा आहे. केंद्रीय समितीच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत असलेला एल-८१९ हा वाणसुद्धा शेतकऱ्यांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा आहे.

इतर अॅग्रो विशेष
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मुख्य अर्थकारण...
यवतमाळच्या अनिकेतने तयार केला फवारणीचा...यवतमाळ ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधा सर्वदूर...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर...पणजी : गेल्या एक वर्षापासून अधिक काळ...