दराच्या प्रतीक्षेतील कांद्याला फुटले कोंब

दराच्या प्रतीक्षेतील कांद्याला फुटले कोंब
दराच्या प्रतीक्षेतील कांद्याला फुटले कोंब

वडेल, जि. नाशिक :  आज ना उद्या दर वाढला, की नफा नाही, निदान गुंतवलेले भांडवल तरी निघेल, या आशेने कांदा बाजारात न नेता योग्य दराची प्रतीक्षा करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या ोकांद्याला शेतातच कोंब फुटले आहेत. यामुळे कांद्याचे पीक मातीमोल ठरत असल्याचे चित्र आहे.

कांदा पिकाच्या दरातील कमालीच्या घसरणीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. नामपूर बाजार समितीत कांद्याला पन्नास पैसे प्रतिकिलो मिळालेला दर असो किंवा देवळ्यासह अनेक ठिकाणी कांदा रस्त्यावर फेकून दिल्याची घटना असो, एकूणच कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कांदा बियाण्याची खरेदी, रोपाची लागवड, विविध रासायनिक खतांची फवारणी, पीक मशागत व पिकाची काढणी या सगळ्या खर्चिक प्रक्रियेतून जाऊन हातातोंडाशी आलेले कांद्याचे पीक बाजारात नेल्यानंतर हातात भोपळा येत असल्याने अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचले आहेत.

डीर फुटलेले पीक आता विक्रीला नेऊ शकत नसल्याने ते एकतर फेकून द्यावे लागणार किंवा जनावरांना खाऊ घालावे लागणार आहे. कांदा पिकाच्या  या आतबट्ट्याच्या परिस्थितीमुळे कसमादे परिसरातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर गेला असून, कर्जबाजारी झाला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com