agriculture news in marathi, Onions persist in Jalgaon, fluctuations in prices | Agrowon

कांद्याची आवक कायम, दरांमध्ये चढउतार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

जळगावात ३५० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचे दर
जळगाव ः जिल्ह्यातील अडावद (ता. चोपडा), किनगाव (ता. यावल), चाळीसगाव, जळगाव, पाचोरा येथील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मागील २० ते २२ दिवसांपासून स्थिर आहे. जळगाव बाजार समितीमध्ये मागील सात ते आठ दिवसांपासून प्रतिदिन २५०० क्विंटल एवढी लाल कांद्याची आवक होत आहे. त्याला प्रतिक्विंटल ३५० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. पांढऱ्या कांद्याचे दरही ३३५० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. 

जळगावात ३५० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचे दर
जळगाव ः जिल्ह्यातील अडावद (ता. चोपडा), किनगाव (ता. यावल), चाळीसगाव, जळगाव, पाचोरा येथील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मागील २० ते २२ दिवसांपासून स्थिर आहे. जळगाव बाजार समितीमध्ये मागील सात ते आठ दिवसांपासून प्रतिदिन २५०० क्विंटल एवढी लाल कांद्याची आवक होत आहे. त्याला प्रतिक्विंटल ३५० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. पांढऱ्या कांद्याचे दरही ३३५० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. 

शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने नाराजी वाढत आहे. अधिक दिवस कांदा काढणी प्रलंबित ठेवता येत नसल्याने काढणीवर आलेला कांदा शेतकरी बाजारात आणत आहेत. काही बाजार समित्यांमध्ये तर दोन दिवस कांदा आणू नका, असा अलिखित फतवा अडतदारांनी काढला आहे. कारण रोज जेवढा कांदा येतो, त्याचे लिलाव पूर्ण होऊन साठवणुकीस अडचणी येत आहेत. 

चाळीसगाव व अडावद येथील बाजारातही प्रतिदिन मिळून ८०० क्विंटलपेक्षा अधिक आवक होत आहे. लाल कांद्याची लागवड जिल्ह्यात चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, चोपडा व यावल भागात अधिक क्षेत्रावर झाली होती. एकाच वेळी कांदा काढणी सुरू झाल्याने आवक कायम आहे. पांढऱ्या कांद्याची आवक औरंगाबाद जिल्ह्यातील घाट परिसरासह भुसावळ, यावल भागातून होत आहे. त्याची आवक जळगाव बाजार समितीत प्रतिदिन ४०० क्विंटलपर्यंत आहे. 

१५ दिवसांपूर्वी लाल कांद्याचे कमाल दर ८०० रुपयांपर्यंत होते, पण जशी आवक स्थिरावली, तसा दरांवर दबाव वाढला. पुढे आणखी १५ ते २० दिवस आवक कायम राहील, असे संकेत जाणकारांनी दिले आहेत.

आमच्या भागात लाल कांद्याची लागवड बऱ्यापैकी झाली होती. परंतु सध्या आवक अधिक असल्याने दरवाढ होणार नाही, असे व्यापारी सांगत आहेत. अधिक दिवस कांदा साठवू शकत नसल्याने मी बाजारात कांद्याची विक्री केली. माझ्या कांद्याला कमाल ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.
- महेंद्र भरत पाटील, शेतकरी, फुपनगरी (जि. जळगाव)

साताऱ्यात कांदा प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये
सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २७) कांद्याची ३१७ क्विंटल आवक झाली आहे. कांद्यास क्विंटलला ५०० ते ८०० असा दर मिळाला आहे. कांद्याच्या आवकेत वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे. 
कांद्याची दिवसेंदिवस आवकेत वाढ होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्‍या चिंतेत वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कांदा लागवडीवर परिणाम होत आहे. सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत २० डिसेंबर कांद्यास क्विंटलला ७०० ते ९०० असा दर मिळाला होता. या तुलनेत कांद्याच्या आवकेत वाढ झाली आहे. 

कराड बाजार समितीत कांद्याचे दर गतसप्ताहाच्या तुलनेत स्थिर आहेत. गुरुवारी कांद्याची ४७७ क्विंटल आवक होऊन कांद्यास क्विंटलला ५०० ते १००० असा दर मिळाला आहे. राज्यात कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणंद बाजार समितीत कांद्याच्या आवकेत वाढ झाली आहे. कांद्याची २४ डिसेंबरला १४०० क्विंटल आवक होऊन कांद्यास क्विंटलला ७०० ते ७५० असा दर मिळाला होता. तर गुरुवारी १२०० क्विंटल आवक होऊन क्विंटलला ६०० ते ६७५ असा दर मिळाला आहे. 

माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा, पुणे जिल्ह्यांतील पुरंदर आदी ठिकाणावरून आवक होत आहे. कांद्याच्या दराची किरकोळ विक्री दर्जा, आकार यावर कमी जास्त होत असून सध्या १० ते १५ रुपये किलोप्रमाणे किरकोळ विक्री केली जात आहे. 

नाशिकला लाल कांदा प्रतिक्विंटल ४०० ते ७५१ रुपये
नाशिक  : नाशिक बाजार समितीत गुरुवारी (ता. २७) कांद्याची एकूण आवक ७ हजार क्विंटल झाली. या वेळी लाल कांद्याला प्रतिक्विंटलला ४०० ते ७५१ व सरासरी ६५० रुपये दर मिळाला. लासलगाव बाजार समितीत या वेळी १४ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली, तर लाल कांद्याला क्विंटलला ३०१ ते ७५२ व सरासरी ६२५ रुपये दर मिळाला. हीच स्थिती पिंपळगाव बसवंत बाजार समितीत होती. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत लाल कांद्याला ४०० ते ७४१ व सरासरी ६६० रुपये दर मिळाला. 

मागील आठवड्यापासून या बाजार समितीतील कांद्याची आवक व दर स्थिर आहे. लालच्या तुलनेत उन्हाळ कांद्याला अत्यल्प दर मिळाले. या वेळी उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटलला १०० ते ४०० व सरासरी ३२० रुपये दर मिळाले. उन्हाळ कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याला स्थानिक, तसेच जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून वाढती मागणी झाली. परिणामी, उन्हाळ कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याला तेजीचे दर मिळाले. 
नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्या व ४५ उपबाजारांत कांद्याची उलाढाल होते. मागील दोन महिन्यांपासून बाजारात लाल कांद्याचे आगमन झाले आहे. त्यामुळे या काळात उन्हाळ कांद्याला होणारी मागणी घटली आहे. मात्र तरीही बाजारातील उन्हाळ कांद्याची आवक वाढती आहे. परिणामी, उन्हाळ कांद्याचे दर मागील दोन महिन्यांत क्विंटलला ९०० रुपयांवरून १०० रुपयांपर्यंत उतरले आहेत. या स्थितीत डिसेंबर महिन्यात उन्हाळ कांद्याला दर मिळतील, या आशेने चाळीत कांदा साठवून ठेवलेल्या कांदा उत्पादकांची मात्र मोठीच निराशा झाली आहे. 

अद्यापही शेतकरी व्यापाऱ्यांकडे ४० टक्के उन्हाळ कांदा शिल्लक आहे. इतक्‍या मोठ्या प्रमाणावर कांदा शिल्लक असल्याची मागील ५० वर्षांतील ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते. या स्थितीत उन्हाळ कांद्याचे भवितव्य मात्र धूसरच असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. दरम्यान, लाल कांद्याचे सरासरी दरही दीड महिन्यात क्विंटलला १८०० वरून ६५० वर येऊन स्थिरावले आहेत. उन्हाळ कांद्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असल्याने अजून १५ दिवस तरी लाल कांद्याचे दर स्थिर राहतील, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.  

नगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल १०० ते ८०० रुपये 
नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज गुरुवारी (ता. २७) कांद्याला १०० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत दर मिळाला. आज जवळपास ४० हजार गोण्यांची आवक झाली होती. नगरमध्ये कांद्याला अजूनही पुरेसा दर मिळत नसल्याने शेतकरी मात्र हवालदिल आहेत. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी, गुरुवारी व शनिवारी कांद्याचे लिलाव होतात. येथे बीड, औरंगाबाद, सोलापूर, पुणे या भागांतून कांद्याची आवक होत असते. गेल्या महिनाभरापासून कांद्याला पुरेसा दर नाही. 

गेल्या पंधरा दिवसांच्या तुलनेतच आजही कांद्याला १०० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत आणि सरासरी पाचशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. नगरसह पारनेर, संगमनेर, राहाता, नेवासा बाजार समितीतही सध्या पंधरा दिवसांपासून १०० रुपयांपासून ७०० ते ८०० रुपये दर मिळत आहे. दर कमी असला तरी आता उन्हाळी व रब्बीतील साठवलेला कांदा खराब होऊ लागल्याने शेतकरी विक्रीला आणत असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

सांगलीत कांदा प्रतिक्विंटल ३०० ते ८५० रुपये
सांगली ः येथील विष्णूअण्णा पाटील भाजीपाला व फळे दुय्यम बाजार आवारात कांद्याची आवक स्थिर आहे. गुरुवारी (ता. २७) कांद्याची २३०७ क्विंटल झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ३०० ते ८५० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

येथील बाजार आवारात सातारा, सोलापूर, नगर तसेच कर्नाटकातून कांद्याची आवक होते. गेल्या सप्ताहापेक्षा कांद्याची आवक आणि दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली. गुरुवारी (ता. २०) कांद्याची ३५१३ क्विंटल आवक झाली होती. 
त्यास प्रतिक्विंटल ३५० ते १२००, तर सरासरी ७७५ रुपये असा दर होता. शुक्रवारी (ता. २१) कांद्याची २३७६ क्विंटल आवक झाली असून, त्यास प्रतिक्विंटल ३५० ते ११५० रुपये, तर सरासरी ७५० रुपये असा दर मिळाला. 
शनिवारी (ता. २२) कांद्याची २३४९ क्विंटल आवक झाली होती. कांद्यास प्रतिक्विंटल ३५० ते ११५० तर सरासरी ७५० रुपये असा दर होता. सोमवारी (ता. २४) कांद्याची २४२६ क्विंटल आवक झाली होती. कांद्यास प्रतिक्विंटल ३०० ते ९५०, तर सरासरी ६२५ असा दर मिळाला. पुढील सप्ताहात कांद्याची आवक आणि दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.

येथील बाजार समितीत गुळाची आवकीत किंचित वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. २७) गुळाची २५९१ क्विंटल आवक झाली होती. गुळास प्रति क्विंटल ३००० ते ३७८० तर सरासरी ३३९० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सुत्रांनी दिली. बेदाण्याची २७०४ क्विंटल आवक झाली. बेदाण्यास प्रति क्विंटल १० हजार ते २४ हजार २०० रुपये तर सरासरी १७ हजार १०० रुपये असा दर होता.

बटाट्याची ५८५ क्विंटल आवक झाली होती. बटाट्यास प्रति क्विंटल ८०० ते १३०० रुपये असा दर मिळाला. लसणाची १०० क्विंटल आवक झाली असून त्यास प्रति क्विंटल ६०० ते २१०० रुपये असा दर होता.डाळिंबाची ८० डझनाची आवक झाली. डाळिंबास प्रति दहा किलोस १५० ते ४५० रुपये असा दर मिळाला. सफरपंचदाची ७०० पेटीची आवक झाली होती. सफरचंदाच्या प्रति पेटीस ६०० ते १००० रुपये असा दर होता. 

बोरांची ३० क्विंटल आवक झाली असून त्यास प्रति क्विंटल ५०० ते २००० रुपये असा दर मिळाला. शिवाजी मंडईत वांग्याच्या आवकीत वाढ झाली आहे. दररोज वांग्याची २५० बॉक्स आवक होत असून त्यास प्रति दहा किलोस ३०० ते ४०० रुपये असा दर मिळतोय. हिरव्या मिरचीची दररोज ८० ते १०० पोत्यांची आवक होत असून त्यास प्रति दहा किलोस २५० ते ३०० रुपये असा दर मिळाला.

इतर बाजारभाव बातम्या
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
खानदेशात केळीचे दर दबावातजळगाव  ः खानदेशात केळीचे दर महिनाभरापासून...
परभणीत जांभूळ प्रतिक्विंटल ४००० ते ८०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात वांगी प्रतिक्विंटल १५०० ते ६०००...अकोल्यात प्रतिक्विंटल २००० ते ३५०० रुपये ...
रत्नागिरीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल...रत्नागिरी ः कोल्हापूर, बेळगाव येथून आलेल्या विविध...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये...अकोला ः हंगामाच्या तोंडावर पैशांची तजवीज...
नाशिकमध्ये आले प्रतिक्विंटल ८७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची ३८०० ते ४०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मंचरला कांद्याच्या भावात घसरणमंचर, जि. पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर...
रत्नागिरीत टॉमेटो प्रतिक्विंटल ३००० ते...रत्नागिरी ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५२५ रुपये...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक आणि दरात...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
अमरावती बाजारात भुईमूग शेंगांचे दर आणि...अमरावती ः स्थानिक बाजार समितीत नव्या भुईमूग...
सोलापुरात वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
टोमॅटो, हिरवी मिरचीची आवक कमी; दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...