agriculture news in marathi, Online deadline for Drip subsidy extented | Agrowon

ठिबक अनुदानासाठी ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 जानेवारी 2018

पुणे : प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेसाठी निधी उपलब्ध असल्याने ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी शेतकऱ्यांना जादा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे आता जानेवारीतदेखील ठिबक अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी शेतकऱ्यांना मिळते आहे. 

ठिबकसाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला यंदा ५५ टक्के तर इतर शेतकऱ्यांना सरसकट ४५ टक्के अनुदान दिले जात आहे. त्यानुसार आतापर्यंत डीबीटीच्या माध्यमातून १९९ कोटी रुपये बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. पुढील काही दिवसात अजून किमान दीडशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पुणे : प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेसाठी निधी उपलब्ध असल्याने ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी शेतकऱ्यांना जादा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे आता जानेवारीतदेखील ठिबक अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी शेतकऱ्यांना मिळते आहे. 

ठिबकसाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला यंदा ५५ टक्के तर इतर शेतकऱ्यांना सरसकट ४५ टक्के अनुदान दिले जात आहे. त्यानुसार आतापर्यंत डीबीटीच्या माध्यमातून १९९ कोटी रुपये बॅंक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. पुढील काही दिवसात अजून किमान दीडशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

फलोत्पादन संचालक प्रल्हादराव पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिबक अनुदान वितरणाचे राज्यभर नियोजन केले जात आहे. ''ऑनलाइन अर्जाची ‘विंडो’ यंदा एक मे २०१७ रोजी उघडण्यात आली होती. ३१ डिसेंबरपर्यंतच ही विंडो सुरू ठेवण्याचे शासनाने आधी निश्चित केले होते. मात्र, आता मुदतवाढ मिळाली आहे. तथापि, हा नवा कालावधी किती दिवसांचा राहील याविषयी शासनाच्या स्पष्ट सूचना अजून प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र, मुदती उलटल्यानंतर देखील शेतकऱ्याकरिता ऑनलाइन अर्ज भरता येत असल्यामुळे ठिबक कंपन्यांची देखील गैरसोय टळली आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

अनुदानासाठी शेतकऱ्याला पूर्वसंमतिपत्र अत्यावश्यक असते. शेतकऱ्यांनी यापूर्वी २०१३-१४ व २०१४-१५ या कालावधीत पूर्वसंमतिपत्रे दिली. या शेतकऱ्यांनी संच बसविल्यानंतर देखील अनुदान दिले गेले नव्हते. मात्र, अशा शेतकऱ्यांना देखील १९४ कोटी रुपये वाटण्यात आल्यामुळे राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांच्या अनुदानविषयक तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.
 

 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
अंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...
रोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...
साखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...
‘ॲग्रोवन’ आमचा..! आम्ही ‘ॲग्रोवन’चे..!!पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...
वर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...
भारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
चंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...
रत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...
‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण !पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...
कृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...
चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...
केसर आंबा संकटातचऔरंगाबाद :  सुरवातीला मोहराच्या काळात...
त्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद  : गतवर्षी शेतकरी संपानंतर...
पीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...
खडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...
नैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...
जमिनीवरील अत्याचार थांबवा !पुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...
दुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...
मुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...