agriculture news in marathi, online registration may for cotton sale, nagpur, maharashtra | Agrowon

हमीभावाने कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीची चर्चा
टीम अॅग्रोवन
रविवार, 30 सप्टेंबर 2018

कापूस खरेदीच्या संदर्भाने राज्य सरकारसोबत चर्चा सुरू आहे. आमची खरेदीसंदर्भाने तयारी पूर्णत्वास गेली असून, शासनाचे आदेश मिळताच खरेदी केली जाईल. चर्चेदरम्यान तूर, हरभऱ्याप्रमाणे यंदाच्या हंगामात कापसाकरितादेखील ऑनलाइन नोंदणीचा विचार सरकारचा आहे. कापूस उत्पादकांना हमीभावाने विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. यावर चर्चा सुरू असून, अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
- उषाताई शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कापूस महासंघ.

नागपूर  ः तूर, हरभरा, मूग, उडीद, सोयाबीननंतर आता येत्या हंगामात कापसासाठीदेखील ऑनलाइन नोंदणी शेतकऱ्यांना करावी लागण्याची शक्‍यता आहे. नोंदणीनंतरच शेतकऱ्यांना आपला कापूस हमीभाव केंद्रावर विकता येणार आहे. त्या संदर्भाने राज्य व केंद्र शासन स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हमीभावाने केवळ शेतकऱ्यांच्याच शेतीमालाची खरेदी व्हावी, या उद्देशाने सरकारने शेतीमाल विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सक्‍तीची केली आहे. यापूर्वी तूर, हरभरा आणि ऑक्‍टोबरपासून मूग, उडीद, सोयाबीन खरेदी केली जाणार आहे. या सर्व शेतीमालाच्या विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली गेली. हमीभावाने व्यापाऱ्यांचा शेतीमाल विकला जाऊ नये याकरिता ही खबरदारी घेतली गेली. या माध्यमातून गैरप्रकाराला आळा बसल्याचा सरकारचा दावा आहे. त्यामुळे येत्या हंगामात हमीभाव कापूस खरेदीकरिता हाच फंडा अवलंबिण्याचे प्रस्तावित असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. 
 

इतर ताज्या घडामोडी
`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्‍त शिवार अभियानातंर्गत भूजल...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...
सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...
नगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...
सोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...
नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...
सोलापुरातील रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी...सोलापूर : सोलापूर-विजापूर राष्ट्रीय...
योग्य वेळी करा मिरीची काढणीमिरी घोसामधील एक ते दोन मणी पिवळे अगर नारंगी...
नाशिकला वांगी, घेवडा, आले दर तेजीतनाशिक : गत सप्ताहात नाशिक बाजार समितीत बहुतांश...
बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...
प्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...
ऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...
नामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...
वजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...
कोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...
हमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...