agriculture news in marathi, Online registration in the shopping centers continues to stumble | Agrowon

जळगाव जिल्ह्यात खरेदी केंद्रांतील आॅनलाइन नोंदणी अडखळत सुरू
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

जळगाव : कडधान्य खरेदीसंबंधी शासकीय खरेदी केंद्रांची तयारी झाली आहे; परंतु प्रत्यक्षात खरेदी सुरू नाही. त्यातच या खरेदीसंबंधी जी ऑनलाइन नोंदणी सुरू आहे, ती अडखळत आहे. जेवढे अर्ज शेतकऱ्यांनी संबंधित खरेदी केंद्राच्या कार्यालयात जमा केले, त्यातील निम्मेच अर्ज ऑनलाइन जमा झाल्याची माहिती मिळाली आहे.

जळगाव : कडधान्य खरेदीसंबंधी शासकीय खरेदी केंद्रांची तयारी झाली आहे; परंतु प्रत्यक्षात खरेदी सुरू नाही. त्यातच या खरेदीसंबंधी जी ऑनलाइन नोंदणी सुरू आहे, ती अडखळत आहे. जेवढे अर्ज शेतकऱ्यांनी संबंधित खरेदी केंद्राच्या कार्यालयात जमा केले, त्यातील निम्मेच अर्ज ऑनलाइन जमा झाल्याची माहिती मिळाली आहे.

ऑनलाइन नोंदणी सुरू ठेवा, परंतु शासकीय खरेदी केंद्रात खरेदी सुरू करा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगाम व इतर कारणांसाठी निधीची आवश्‍यकता आहे. जिल्ह्यात तीन खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. जामनेर येथे केंद्र सुरू करण्यासंबंधीचा निर्णय अजून झालेला नाही. या तिन्ही केंद्रांमध्ये खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरूच आहे.

शेतकऱ्यांकडून एक अर्ज, सातबारा उतारा, बॅंक पासबुक व आधार कार्ड यांची झेरॉक्‍स घेतली जात आहे. अर्ज येण्याची गती बऱ्यापैकी होती. परंतु नोंदणी गतीने झाली नाही. सर्व्हर डाउन, ॲपसंबंधीच्या अडचणी कायम आहेत. एका अर्जासोबत तीन पुरावे जोडावे लागतात. ते अपलोड करताना १५ ते २० मिनिटे एकाच अर्जासाठी लागतात. सुमारे तीन हजार अर्ज ऑनलाइन झाले आहेत. पाचोरा, अमळनेर व जळगाव येथे खरेदी केंद्र मंजूर असून, या केंद्रांमध्ये नोंदणी करण्यात येत आहे.

बाजारात दरवाढ

ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया अडखळत सुरू असतानाच बाजारात उडीद व मुगाच्या दरात सुधारणा झाली आहे. उडदासह मुगाला ५००० ते ५१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर आहेत. हे दर टिकून राहतील. कारण उत्पादन कमी आले आहे. यामुळे अनेक शेतकरी शासकीय खरेदी केंद्राची प्रतीक्षा न करता उडीद, मुगाची विक्री करीत आहेत. चोपडा, अमळनेर येथील बाजार समित्यांमध्ये उडदाची बऱ्यापैकी आवक होत असल्याचे सांगण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...