agriculture news in marathi, online registration start for procurment, buldhana, maharashtra | Agrowon

संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन नोंदणी सुरू करण्याचे अादेश
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल खरेदीसाठी स्थानिक खरेदी विक्री संघाना सुरवातीला काळ्या यादीत टाकल्याने अद्यापही काही ठिकाणी खरेदीच्या दृष्टीने नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली नव्हती. मध्यंतरी शासनाने धोरण मवाळ करीत अशा संस्थांवरील निर्बंध हटविले. अाता या संस्थांना खरेदीची संधी मिळण्याची शक्यता असून, पहिल्यांदा अाॅनलाइन नोंदणी प्रक्रिया राबविण्याचे सूचविण्यात अाले. त्यानुसार जिल्ह्यातील संग्रामपूर केंद्रावर बुधवारपासून (ता. १४) शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत मूग, उडीद, सोयाबीनच्या खरेदीसाठी अाॅनलाइन नोंदणीला सुरवात करण्याबाबत अादेश देण्यात अाले अाहेत.

बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल खरेदीसाठी स्थानिक खरेदी विक्री संघाना सुरवातीला काळ्या यादीत टाकल्याने अद्यापही काही ठिकाणी खरेदीच्या दृष्टीने नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली नव्हती. मध्यंतरी शासनाने धोरण मवाळ करीत अशा संस्थांवरील निर्बंध हटविले. अाता या संस्थांना खरेदीची संधी मिळण्याची शक्यता असून, पहिल्यांदा अाॅनलाइन नोंदणी प्रक्रिया राबविण्याचे सूचविण्यात अाले. त्यानुसार जिल्ह्यातील संग्रामपूर केंद्रावर बुधवारपासून (ता. १४) शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत मूग, उडीद, सोयाबीनच्या खरेदीसाठी अाॅनलाइन नोंदणीला सुरवात करण्याबाबत अादेश देण्यात अाले अाहेत.

अामदार डॉ. संजय कुटे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या तालुक्यातील शेतकऱ्यांना शेगाव येथील नोंदणी केंद्राएेवजी संग्रामपूरलाच नोंदणीची सोय उपलब्ध करून दिली अाहे. ऑनलाइन नोंदणीसंदर्भात संग्रामपूर खरेदी विक्री संस्थेला पोर्टलद्वारा आदेश मिळाल्याची माहिती या संस्थेकडून देण्यात अाली.

मागील हंगामात हमीभाव खरेदीत अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत संग्रामपूर खरेदी विक्री संस्थेला काळ्या यादीत टाकले होते. त्यामुळे संग्रामपूर येथील खरेदीबाबत या वर्षी गोंधळाची स्थिती तयार झाली होती. एकीकडे राज्यभर अाॅनलाइन नोंदणी होत असताना या तालुक्यातील शेतकरी स्थानिक पातळीवर सुविधा मिळण्यापासून वंचित होते. यावर अाता तोडगा निघाल्याने हजारो शेतकऱ्यांना अापल्या शेतीमालाची अाॅनलाइन नोंदणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मंगळवारी कागदपत्रांची चाचपणी व इतर पडताळणी नाव नोंदणीसाठी करण्याचे अादेश देण्यात अाले. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर सायंकाळी पोर्टलवरून सदर संस्थेला यूजर आयडी देण्यात अाला. तातडीने मूग, उडीद, सोयाबीनची विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी सुरू करण्याचे सुचविण्यात अाले.

अाॅनलाइन नोंदणीसाठी मुदतवाढ गरजेची
मूग, उडीद, सोयाबीनची विक्री करण्यासाठी अाॅनलाइन नोंदणीस १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली अाहे. अाता संग्रामपूर हे केंद्र उशिराने सुरू केले जात अाहे. या ठिकाणी नाव नोंदणीची प्रक्रियाच मुदत संपण्याच्या एक दिवस अगोदर सुरू झाली. त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांसाठी १५ दिवसांची मुदतवाढ मिळणे गरजेचे अाहे. जिल्हा स्तरावरून जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे या मुदतवाढीचा प्रस्ताव सादर केला असल्याचे सांगण्यात अाले.

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...