agriculture news in marathi, onlu 12 rs subsidy per quintal on soyabean | Agrowon

सोयाबीनसाठी क्विंटलला अवघे १२ रुपये अनुदान
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

अकोला : राज्य शासनाने जाहीर केलेल्या सोयाबीन अनुदानाचे वितरण सुरू झाले असून, बाळापूर तालुक्यातील एका शेतकऱ्यांना क्विंटलला अवघी १२ रुपये मदत मिळाली आहे. हा शेतकऱ्यांची खिल्ली उडवण्याचा प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

अकोला : राज्य शासनाने जाहीर केलेल्या सोयाबीन अनुदानाचे वितरण सुरू झाले असून, बाळापूर तालुक्यातील एका शेतकऱ्यांना क्विंटलला अवघी १२ रुपये मदत मिळाली आहे. हा शेतकऱ्यांची खिल्ली उडवण्याचा प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

शासनाने गेल्या हंगामात सोयाबीनचे दर घसरल्याने क्विंटलला २०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. यासाठी बाजार समित्यांकडून शेतकऱ्यांचे प्रस्ताव घेण्यात आले. बाळापूर तालुक्यातील खिरपूरी बुद्रुक येथील सोपान दांदळे यांनी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत अठरा क्विंटल सोयाबीन विकले होते. शासनाने अनुदान जाहीर केल्यानंतर त्यांनी रीतसर अनुदानाकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे बाजार समितीत दाखल केली. त्यांनी आत्तापर्यंत अनुदानाची प्रतीक्षा केली.

आता अनुदान जमा झाल्याचे कळाल्यानंतर त्यांनी बँक खाते तपासून पाहले असता खात्यामध्ये २६ नोव्हेंबर २०१७ ला अठरा क्विंटल सोयाबीनसाठी दोनशे सव्वीस रुपये अनुदान जमा झाल्याचे दिसून आले. हा प्रकार म्हणजे टिंगल उडवण्यासारखा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दोनशे सव्वीस रुपये अनुदान म्हणजे शेतकऱ्यांना भिक दिल्यासारखेच. अठरा क्विंटलचे अनुदान छत्तीशे रुपये मिळायला पाहिजे होते; मात्र माझ्या खात्यात दोनशे सव्वीस रुपये जमा झाले आहेत. शासनाने मला नियमानुसार अनुदान द्यायला हवे होते; पण तोकडी रक्कम जमा झाल्याचे दिसत आहे.
- सोपान दांदळे, खिरपुरी बुद्रुक, ता. बाळापूर जि. अकोला

इतर अॅग्रो विशेष
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...