सांगली जिल्ह्यात केवळ १० टक्के पेरण्या

सांगली जिल्ह्यात केवळ १० टक्के पेरण्या
सांगली जिल्ह्यात केवळ १० टक्के पेरण्या

सांगली ः जिल्ह्यात जून महिन्यात अधूनमधून पाऊस झाला आहे. गतवर्षी जून महिन्यात ८६ टक्के इतका पाऊस झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्यात ११८ टक्के म्हणजे जूनच्या महिनाअखेर एकूण १०११ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मात्र, अधूनमधून पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात केवळ १० टक्केच पेरणी झाली आहे. शिराळा तालुक्‍यात गेल्या वर्षीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरवातीला दमदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर अधूनमधून पाऊस पडला. शिराळा तालुक्‍यात जून २०१८ अखेरीस २१२ मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. गत वर्षी जून महिन्यात १३० मिलिमीटर इतका पाऊस झाला होता. कडेगाव तालुक्‍यातदेखील गेल्या वर्षीपेक्षा चांगला पाऊस झाला आहे. या महिन्यात १३३ मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. वास्तविक पाहता गेल्या वर्षीपेक्षा वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, मिरज तालुक्‍यात अपेक्षित पाऊस झाला आहे. मात्र, अद्याप पेरण्या नाही.

तालुका जून २०१७ टक्केवारी जून २०१८ टक्केवारी
मिरज २९.७ ४२.७ ११४.९ १६४.१
जत १०१.९ १३३.४ ८१.४ १०६.५
खानापूर-विटा ६१.४ ७१.० १३१.६ १५२.१
वाळवा-इस्लामपूर ५७.८ ५६.३ ८८.३ ८६.१
तासगाव ३८.५ ४४.३ ४५.३ ५२.१
शिराळा १३०.१ ८२.२ २१२.४ १३४.२
आटपाडी १०२.६ २३३.२ ६३.२ १४३.६
पलूस ४८.० ६२.३ १३३.० १७२.७
कडेगाव ४८.० ६२.३ १३३.० १७२.७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com