agriculture news in marathi, Only 1050 farmers in Naigaon taluka in the debt waiver list | Agrowon

नायगाव तालुक्यातील केवळ १०५० शेतकरी कर्जमाफीत
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

नायगाव, जि. नांदेड  ः नायगाव तालुक्यातील कर्जमाफीच्या यादीतील शेतकऱ्यांची ‘ग्रीन लिस्ट` नुकतीच हाती लागली आहे.  तालुक्यातील ८१ गावांपैकी ७२ गावांतील एक हजार पन्नास शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत आहेत.

नायगाव, जि. नांदेड  ः नायगाव तालुक्यातील कर्जमाफीच्या यादीतील शेतकऱ्यांची ‘ग्रीन लिस्ट` नुकतीच हाती लागली आहे.  तालुक्यातील ८१ गावांपैकी ७२ गावांतील एक हजार पन्नास शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत आहेत.

यापैकी सहा गावातील प्रत्येकी एकाच शेतकऱ्याचा समावेश आहे. तर नऊ गावातील एकाही शेतकऱ्याचे नाव पहिल्या यादीत नसल्याचे ऑनलाईनवर यादी पाहिल्यानंतर समोर आले आहे.चार वर्षे कोरड्या दुष्काळाला सामोरे गेल्यानंतर सहा महिने अनेक पक्ष संघटनांनी मोर्चे, आंदोलन केल्यानंतर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. त्यात असंख्य अटी घातल्या. सगळ्या अटी मान्य करत मोठ्या गैरसोयीला सामोरे जात, रात्रंदिन जागत कर्जमाफीची ऑनलाईन प्रक्रियाही शेतकऱ्यांनी पूर्ण केली. ते झाल्यावरही सरळ स्वरूपात कर्जमाफी केली नाही.

अर्ज भरलेली व्यक्ती शेतकरी आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी गावागावात चावडीवाचन झाले. एवढे होऊनही कर्जमाफीची रक्काम खात्यावर जमा व्हायला तयार नाही. दसरा झाला, दिवाळी झाली. दिवाळी होऊन पंधरवाडाही लोटला तरी कर्जमाफीचा वेग वाढायला तयार नाही. १५ नोव्हेंबरपर्यंत  शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचा निधी जमा होईल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
देशातील रब्बी पेरणी माघारलीनवी दिल्ली  : देशभरात शुक्रवारअखेर (ता. ८)...
कुपोषण, प्रथिने जागृतीकडे लक्ष...पुणे : भारतात प्रथिनांच्या कमततेअभावी होणाऱ्या...
‘त्या’ कंपनीला काळ्या यादीत टाका :...लातूर ः येथील शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर...
रेशन धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशिन...वडूज, जि. सातारा : रेशन घेण्यास आलेल्या...
भारनियमनामुळे शेती ऑफलाइननांदुरा, जि. बुलढाणा : शासनाने सर्व योजनांचे...
दूध संघांना अनुदान द्या : अरुण नरकेपुणे ः राज्य सरकारने दुधाला २७ रुपये प्रतिलिटरचा...
पुण्यात पालेभाज्यांची आवक टिकून; दर...पुणे : मार्केट यार्ड येथील भाजीपाला बाजारात सलग...
साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत...नागपूर : बडोदा येथे फेब्रुवारीत होणाऱ्या 91 व्या...
नरभक्षक बिबट्याला अखेर ठार मारलेमेहुणबारे/ पिलखोड/ चाळीसगाव : गिरणा परिसरात...
सरसकट कर्जमाफीसाठी होणार जेल भरो औरंगाबाद  ः शेतकरी, शेतमजूर, शेतीपूरक...
उद्धव ठाकरे गप्प बसा; अन्यथा रहस्ये...सांगली ः शिवसेना सोडण्याचे कारण उद्धव ठाकरे आहेत...
गिरणा धरणातून पहिले आवर्तन सोडलेचाळीसगाव :  गिरणा धरणातून सिंचनासाठीचे पहिले...
पीक नुकसानीचे दहा दिवसांत पंचनामे...औरंगाबाद : कापूस व धान पिकाच्या झालेल्या...
दक्षिण गुजरात, सौराष्ट्राचा कौल मतपेटीत...अहमदाबाद, गुजरात : येथील विधानसभेच्या पहिल्या...
रोहित्र दुरुस्तीचा विलंब भोवला; भरपाई...अकोला :  वीज रोहित्राची वेळेवर दुरुस्ती न...
व्यावसायिक कल्चरमुळे वाढते...खाद्यपदार्थ किण्वनातील जिवाणूंचा झाला अभ्यास...
बोगस बियाणे निर्मितीच्या संशयावरून...बुलडाणा : नांदुरा तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर...
कृषि सल्ला : पालेभाज्या, फळभाज्याडिसेंबर महिन्यात बहुतांश पालेभाजी पिकांची लागवड...
औरंगाबादेत कांदा १००० ते ३५०० रुपयेऔरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
मध्यम आकाराचे मांसभक्षक येतील पर्यावरण...मध्यम आकाराच्या मांसभक्षक प्राण्यांवर...