नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ १३ टक्के

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ १३ टक्के
नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ १३ टक्के

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील धरणसाठ्यात झपाट्याने घट होत असून आजमितीस जिल्ह्यातील १७ मध्यम, ७ मोठ्या अशा एकूण २४ प्रकल्पांत १३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तर अनेक धरणांनी तळ गाठण्यास सुरवात केली असल्याचे दिसून येत आहे. मात्र, ३ जुलैपर्यंत पाणी पुरेल, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. जोपर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही तोपर्यंत पाण्याचे टँकर सुरूच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

जिल्ह्यातील धरणांची पाणी साठवण क्षमता ६५ हजार ८१४ दलघफू इतकी आहे. सद्यःस्थितीत धरणांत ८ हजार ७८६ दलघफू एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. याच पाण्यावर जिल्हावासीयांची पुढील महिन्याची भिस्त अवलंबून आहे. गतवर्षी आजपर्यंत १३ टक्के पाणीसाठा होता. गंगापूर, करंजवण, दारणा आणि कडवा या चार प्रकल्पांत गेल्यावर्षापेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. तर वाघाड, पुणेगाव, हरणबारी प्रकल्पांतील पाणीसाठा पाच टक्क्यांवर आला आहे. जिल्ह्यात आजमितीस ९२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्यावर्षी ७८ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. चक्रीवादळामुळे माॅन्सून लांबण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवल्याने ग्रामीण भागात टंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

सहा धरणे कोरडी जिल्ह्यात सात धरणे कोरडीठाक पडली आहेत. यात भावली, मुकणे, वालदेवी, भोजापूर, नागासाक्या, माणिकपुंज या धरणांनी तळ गाठला आहे.

गंगापूर समूहात २२ टक्के पाणी शहरवासीयांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात २४ टक्के, काश्यपी ३५ टक्के, गौतमी गोदावरी ९ टक्के तर आळंदीत १२ टक्के असा समूहात एकूण २२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच कालावधीत समूहात १५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत समूहात ७ टक्के अधिक साठा असल्याने टंचाई निर्माण होणार नसल्याचा दावा केला आहे.

जिल्ह्यातील पाणीसाठा : धरण (टक्केवारी) : गंगापूर २४, काश्यपी ३५, गौतमी गोदावरी ०९, आळंदी १२, पालखेड २८, करंजवण १०, वाघाड ०३, ओझरखेड १५, पुणेगाव ०७, तीसगाव ०३, दारणा २९, कडवा १०, नांदूरमध्यमेश्वर ९८, चणकापूर २३, हरणबारी ०३, केळझर ०१, गिरणा १०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com