agriculture news in marathi, Only 25 percent of Marathwada's useful water is available | Agrowon

मराठवाड्यात उपयुक्‍त पाणी उरले केवळ २५ टक्‍के
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या मराठवाड्यातील उपयुक्‍त पाणीसाठ्यातही झपाट्याने घट होते आहे. मराठवाड्यातील ८६८ लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह नद्यांवरील बंधाऱ्यांमध्येही केवळ २५.२८ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा उरला आहे. सर्वाधिक संख्येने असलेले लघु प्रकल्प झपाट्याने कोरडे पडत असून त्यांमध्ये केवळ १६.९५ टक्‍के तर ७५ मध्यम प्रकल्पात केवळ १७. ६१ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या मराठवाड्यातील उपयुक्‍त पाणीसाठ्यातही झपाट्याने घट होते आहे. मराठवाड्यातील ८६८ लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह नद्यांवरील बंधाऱ्यांमध्येही केवळ २५.२८ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा उरला आहे. सर्वाधिक संख्येने असलेले लघु प्रकल्प झपाट्याने कोरडे पडत असून त्यांमध्ये केवळ १६.९५ टक्‍के तर ७५ मध्यम प्रकल्पात केवळ १७. ६१ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मराठवाड्यात हळूहळू गंभीर बनत चालला आहे. मार्चनंतर पाणीसंकटाला सामोरे जावे लागणाऱ्या मराठवाड्यातील जनतेला आता ऑक्‍टोबरपासूनच पाणीटंचाईची झळ सुरू झाली आहे. पाणीसाठ्यांमधील आटत चाललेले पाणीटंचाईमध्ये अधिकची भर घालते आहे. मोठ्या ११ प्रकल्पांपैकी हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर प्रकल्पात केवळ २ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

दुसरीकडे बीड जिल्ह्यातील माजलगाव व मांजरा प्रकल्पांत उपयुक्‍त थेंब नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील सिनाकोळेगाव प्रकल्पातही उपयुक्‍त पाणी आहे. येलदरीतील उपयुक्‍त पाणीसाठाही ९ टक्‍क्‍यांवर आला आहे. निम्न दुधना प्रकल्प १६ टक्‍के, निम्न मनार ३६ टक्‍के, निम्न तेरणा २८ टक्‍के तर सर्वात मोठा असलेल्या जायकवाडी प्रकल्पातही केवळ ३० टक्‍केच उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे. विष्णूपूरी आणि उर्ध्व पेनगंगा प्रकल्पच काय ते ६० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्‍त पाणी असल्याने दिलासा देत आहेत.

 

इतर बातम्या
जळगावच्या पालकमंत्र्यांचा दौरा पुन्हा...जळगाव : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा...
खानदेशातील पाणीटंचाई गंभीरजळगाव : खानदेशात पाणीटंचाई दिवसेंदिवस बिकट होत...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
खानदेशात अनियमित वीजपुरवठाजळगाव : खानदेशात जलपातळी सातत्याने घटत आहे....
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
नाशिक येथे साकारणार 'देवराई' नाशिक : दुर्मीळ देशी प्रजातींच्या वृक्षांचे...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...