agriculture news in marathi, only 6 hour electricity in a day in Solapur, Maharashtra | Agrowon

सोलापुरात शेतीपंपाला दिवसा सहा तासच वीज
टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

विजेची मागणी वाढली आहे. मागणी व पुरवठा यात तफावत निर्माण होत असल्याने हे वाढीव; पण तात्पुरते भारनियमन करावे लागत आहे. अन्यथा सर्व यंत्रणा बंद पडते. दिवसा किंवा रात्री असे काही नाही. मागणी वाढल्यास भारनियमन केले जाते. पाऊस नसल्याने मागणी वाढत आहे. 
- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, महावितरण

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आधीच शेतकरी अडचणीत आला असताना, आता महावितरणने दिवसा शेतीपंपासाठी केल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्याचे भारनियमन आणखी दोन तासांनी वाढवले आहे. त्यामुळे आठ तास मिळणारी वीज आता केवळ सहा तास मिळणार आहे. दुष्काळाच्या सध्याच्या पार्श्‍वभूमीवर महावितरणने जणू दुष्काळात तेरावा अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आणून ठेवली आहे.

महावितरणच्या वतीने शेतीसाठी दिवसा आठ तर रात्री दहा तास वीजपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून महावितरणने दिवसाच्या वीजपुरवठ्यात दोन तासांनी कपात करत भारनियमन वाढवले आहे. त्यामुळे शेतीपंपासाठी दिवसा केवळ सहा तासच वीज मिळत आहे. जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून पाऊसच पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडे जेमतेम पाणी आहे. त्यातच आता महावितरणने भारनियमन वाढविल्यामुळे आहे, ते पाणी तरी पिकांना द्यायचे की नाही? असा सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

महावितरण शेतीपंपासाठी रात्रीच्या वेळेला दहा तास वीजपुरवठा करते. मात्र, रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल नाही. दिवसा असलेल्या वीजपुरवठ्याच्या कालावधीत शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी वीजपंप चालू करतात. मात्र, आता दिवसाच्या कालावधीत महावितरणने वीजपुरवठ्यात घट केली असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. 

शेतकऱ्यांची सत्त्वपरीक्षा
बाजारात सध्या कोणत्याही पिकांना बाजारभाव नाही. कवडीमोल किमतीने भाजीपाला शेतकऱ्यांना विकावा लागत आहे. भाजीपाला घेण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. त्यातच आता महावितरणने वाढीव भारनियमन सुरू केल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. एकप्रकारे शेतकऱ्यांची सत्त्वपरीक्षा सुरू आहे.

इतर अॅग्रो विशेष
पीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...
आपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...
चवगोंडा पाटील, सौरभ कोकीळ, मारुती शिंदे...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची...
जेजुरीत कुलधर्म कुलाचारासाठी भाविकांची...जेजुरी, जि. पुणे : चंपाषष्ठी उत्सवानिमित्त...
नाशिक जिल्ह्यातील माती परीक्षणासाठी ‘...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेती, गावतळे, जलसंपदा,...
राज्यात थंडीत चढउतारपुणे : छत्तीसगडचा दक्षिण भाग, तेलंगणा आणि...
दोन टप्प्यांत ‘एफआरपी’ला विरोधसातारा : साखरेचे दर कोसळल्याने उसाचा पहिला हप्ता...
पीककर्जासाठी उपोषणकर्त्या शेतकऱ्याचे...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
कांदाप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांकडून आढावानाशिक : हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक...
केळीच्या विलियम्स वाणाचा आश्वासक प्रयोग...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील वसंतराव कदम...
वालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची ...दुष्काळी स्थितीत खानदेश व लगतच्या भागातील शेती...
मका भुशाला तीन हजारांचा भावजायखेडा, जि. नाशिक : यंदा तालुक्‍यात अत्यल्प...
ऐन दुष्काळात राज्याला सहकार आयुक्त नाही पुणे  : तीव्र दुष्काळाकडे राज्याची सुरू...
कात्रज मिठाईसाठी वापरणार नायट्रोजन...पुणे  : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात...
कुलगुरू निवड प्रक्रियेतील विलंब ...मुंबई : राज्यातील कृषी विद्यापीठांच्या...
जपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...