agriculture news in marathi, Only Banana growers share fruit crop Insurance Scheme | Agrowon

जळगावात पीकविमा योजनेत केळी उत्पादकांचाच सहभाग
टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

जळगाव : जिल्ह्यात यंदा हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेसंबंधी हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. केवळ केळी उत्पादकच या योजनेत सहभागी होत असून, आजघडीला फक्त १८ हजार शेतकऱ्यांनी आपल्या केळीसंबंधीचा विमा काढल्याची माहिती आहे.

फळ पीकविमा योजनेचा कालावधी १ नोव्हेंबर २०१७ ते ३० जुलै २०१८ पर्यंत असणार आहे. जिल्ह्यात ३१ हजार केळी उत्पादक या योजनेत सहभागी होतील, अशी अपेक्षा होती. कर्जदार केळी उत्पादकांचे संमतीपत्रक भरून त्यांचा विमा हप्ता ज्या बॅंकेकडून पीक किंवा केळी कर्ज घतले आहे तीच बॅंक भरत आहे.

जळगाव : जिल्ह्यात यंदा हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेसंबंधी हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. केवळ केळी उत्पादकच या योजनेत सहभागी होत असून, आजघडीला फक्त १८ हजार शेतकऱ्यांनी आपल्या केळीसंबंधीचा विमा काढल्याची माहिती आहे.

फळ पीकविमा योजनेचा कालावधी १ नोव्हेंबर २०१७ ते ३० जुलै २०१८ पर्यंत असणार आहे. जिल्ह्यात ३१ हजार केळी उत्पादक या योजनेत सहभागी होतील, अशी अपेक्षा होती. कर्जदार केळी उत्पादकांचे संमतीपत्रक भरून त्यांचा विमा हप्ता ज्या बॅंकेकडून पीक किंवा केळी कर्ज घतले आहे तीच बॅंक भरत आहे.

अग्रणी बॅंकेने त्यासंबंधीच्या सूचना जारी केल्या आहेत. जेवढे केळी पीक कर्जदार अग्रणी व राष्ट्रीयीकृत बॅंकांचे आहेत तेवढेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे आहेत.

या बॅंकांनी कार्यवाही सुरू केली आहे. परंतु अनेक शेतकरी संमतीपत्र भरून देत नसल्याची माहिती आहे. तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक स्वरूपाची असून, योजनेत सहभाग घ्यायचा असेल, तर आपले सरकार किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी)मध्ये ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे. किंवा नजीकच्या सहकारी किंवा राष्ट्रीयीकृत बॅंकेत जाऊन विमा हप्ता व अर्ज भरायचा आहे. बिगर कर्जदार केळी उत्पादकांचाही फारसा प्रतिसाद लाभलेला नाही.

जिल्ह्यात डाळिंब, पेरू उत्पादकही काही संख्येत आहेत. परंतु किडी डाळिंब उत्पादक या योजनेत सहभागी झाले याची नेमकी आकडेवारी कृषी विभाग किंवा अग्रणी बॅंकेकडे नाही.

मुदत संपतेय
फळ पीकविमा योजना मागील वर्षाप्रमाणे नऊ महिने कालावधीची आहे. योजनेत सहभागाची मुदत ३१ ऑक्‍टोबरपर्यंत असून, सहा हजार रुपये हेक्‍टरी विमा हप्ता शेतकऱ्याला भरायचा आहे.

इतर बातम्या
जमीन आरोग्यपत्रिकेच्या गुणात्मक कामाकडे...पुणे  : राज्यात शेतकऱ्यांना जमीन...
बारामती कृषी महाविद्यालय देशात रोल मॉडेलबारामती, जि. पुणे ः येथील कृषिक प्रदर्शनासाठी...
'शुगरकेन हार्वेस्टर'ला अनुदान देण्यास...पुणे  : राज्यात ऊसतोडणीसाठी वापरल्या...
सांगली जिल्ह्यात तूर काढणी अंतिम...सांगली : जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ,...
मका विक्रीच्या रकमेसाठी जळगावमधील...जळगाव ः जिल्ह्यात खरिपातील मका विक्रीचे...
तीन जिल्ह्यांत ८ लाख जमीन...परभणी : कृषी विभागाच्या मृदा आरोग्यपत्रिका वितरण...
भरपाईबाबत समित्यांचे निष्कर्ष बियाणे...पुणे : राज्यात गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान...
कापूस पिकासाठी यवतमाळ जिल्हा पोषक नाहीनागपूर : यवतमाळ जिल्ह्यात उथळ ते मध्यम खोल जमिनी...
गडचिरोली जिल्ह्यात दुष्काळ जाहीर...गडचिरोली : कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या...
संपूर्ण कर्जमाफी; 'स्वामिनाथन'साठी...मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमाफी, आत्मसन्मान योजना...
वाटाण्याच्या मुळांतील वैशिष्ट्यपूर्ण...पिकांची पांढरी मुळे ही खतांच्या शोषणामध्ये मोलाची...
साखर कारखानदारीला ५ हजार कोटींचा तोटाभवानीनगर, जि. पुणे ः साखरेच्या घसरलेल्या भावाचा...
रामदेव बाबाच खरे ‘लाभार्थी’ : अशोक...मुंबई  : ‘आपले सरकार’ सेवा केंद्रामार्फत...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ४७ टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांमध्ये...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या...औरंगाबाद : बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीच्या...
साडेचार लाख टन तुरीची महाराष्ट्रात...मुंबई  ः महाराष्ट्र हे देशात महत्त्वाचे तूर...
उस्मानाबाद ९.४ अंशांवरपुणे ः उत्तरेकडून थंड वारे कमी-अधिक प्रमाणात वाहत...
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या केंद्राचा...मुंबई : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील चौथ्या...
कृषीचा पतपुरवठा यंदा वाढण्याचे संकेतनवी दिल्ली ः देशातील शेतीसमोरील प्रश्न दिवसेंदिवस...
सीआयबीआरसी, कृषी, आरोग्य विभागावर...अमरावती ः विषबाधाप्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या...