agriculture news in marathi, Only one and a half percent sowing in Nandurbar district | Agrowon

नंदुरबार जिल्ह्यात केवळ दीड टक्के पेरण्या
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 जून 2018

नंदुरबार : जिल्ह्यात पाऊस फारसा सक्रिय नसल्याने पेरणीही अत्यल्प आहे. शहादा तालुक्‍यात सर्वाधिक अडीच हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. तर नंदुरबार, तळोदा व नवापूर मिळून सुमारे दीड हजार हेक्‍टवर पेरणी झाली असून, फक्त दीड टक्‍के पेरणी पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.

नंदुरबार : जिल्ह्यात पाऊस फारसा सक्रिय नसल्याने पेरणीही अत्यल्प आहे. शहादा तालुक्‍यात सर्वाधिक अडीच हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. तर नंदुरबार, तळोदा व नवापूर मिळून सुमारे दीड हजार हेक्‍टवर पेरणी झाली असून, फक्त दीड टक्‍के पेरणी पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यात एकूण दोन लाख ७३ हजार ७०० हेक्‍टरवर खरिपात पेरण्या व लागवडी होतील, असे उद्दीष्ट आहे. आता जून महिना संपत आला तरी चांगला पाऊस झालेला नाही. पूर्वहंगामी कापूस लागवड तेवढी आटोपली आहे. शहादा, तळोदा व नंदुरबार तालुक्‍यांतील तापी काठावर कापूस लागवड झाली आहे. इतरत्र कोरडवाहू क्षेत्र अधिक आहे. नवापूर, धडगाव, अक्कलकुवा भागातील अधिकचे क्षेत्र हे पर्वतीय आहे. या भागात पेरणीलायक क्षेत्र कमी असल्याने ृपेरणीची नेमकी आकडेवारी या भागातून समोर आलेली नाही. या भागात पूर्वहंगामी कापूस लागवडीचे क्षेत्र सुमारे १८ ते २०हजार हेक्‍टर असल्याचे सांगण्यात आले.

 मध्यंतरी सातपुडा पर्वतालगत पाऊस झाला होता. त्यानंतर गोगापूर, म्हसावद, जवखेडे, ब्राह्मणपुरी, परिवर्धे आदी शहादा व तळोदा तालुक्‍यांतील प्रतापपूर, बोरद आदी भागात पेरण्या सुरू झाल्या. याच भागात कृत्रिम जलसाठे मुबलक असल्याने पूर्वहंगामी कापूस लागवडही अधिकची झाली आहे.

मंगळवारी (ता. २६) काही भागात ढग दाटून आले. परंतु सरी बरसल्या नाहीत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उडीद, मूग, तूर व ज्वारीची पेरणी झाली आहे. परंतु सोयाबीन, कोरडवाहू कापूस लागवड फारशी झालेली नाही, अशी माहिती मिळाली.

 

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...