agriculture news in marathi, Only one percent of debt ratios in the rabi season | Agrowon

मराठवाड्यात रब्बी हंगामात केवळ १ टक्‍का कर्जवाटप
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 डिसेंबर 2017

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत रब्बी हंगामासाठी दोन महिन्यांत उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ एक टक्‍का कर्जवाटप केले गेले. त्यामुळे खरीप हातचा गेलेल्या शेतकऱ्यांना रब्बीसाठी एकतर खासगीतून कर्जउचल करून वा उधारीतून खते-बियाण्यांची सोय करण्याची वेळ आली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत रब्बी हंगामासाठी दोन महिन्यांत उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ एक टक्‍का कर्जवाटप केले गेले. त्यामुळे खरीप हातचा गेलेल्या शेतकऱ्यांना रब्बीसाठी एकतर खासगीतून कर्जउचल करून वा उधारीतून खते-बियाण्यांची सोय करण्याची वेळ आली आहे.

औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चारही जिल्ह्यांसाठी यंदाच्या खरीप हंगामाकरिता ९३१ कोटी ४५ लाख ८१ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. २५ नोव्हेंबरपर्यंत केवळ ९६८ सभासदांना ९ कोटी ५६ लाख ७३ हजारांचे म्हणजे उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ १ टक्‍का कर्जवाटप करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यात व्यापारी व ग्रामीण बॅंकांच्या शाखांनी, जालना जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व ग्रामीण बॅंक, परभणी जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व व्यापारी बॅंक आणि हिंगोली जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने अजून कर्जवाटपाच्या मिळालेल्या उद्दिष्टातील एक रुपयाही वाटण्याची तसदी घेतली नाही.

औरंगाबाद जिल्ह्यातील ३०८, जालना जिल्ह्यातील १००, परभणी जिल्ह्यातील १०८, तर हिंगोली जिल्ह्यातील ४५२ शेतकऱ्यांनाच रब्बी हंगामासाठी कर्जाचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्यात १ कोटी २ लाख ७८ हजार, जालना जिल्ह्यात १ कोटी ३८ लाख, परभणी जिल्ह्यात ६७ लाख ३१ हजार, तर हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक ६ कोटी ४८ लाख ६४ हजारांचे कर्जवाटप करण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली. एकीकडे कर्जमाफीचा घोळ, दुसरीकडे हातचा गेलेला खरीप त्यातच शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात बॅंकांचे नसलेले स्वारस्य, यामुळे शेतकऱ्यांची कमालीची परवड होत असल्याचे चित्र आहे.

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...