agriculture news in marathi, only peon and clerk working in tahsil agri office, Maharashtra | Agrowon

तालुका कृषी कार्यालयाचा कारभार हाकतात शिपाई आणि लिपीक
टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 जुलै 2018

गडचिरोली ः दुर्गम, आदिवासीप्रवण भागात कृषी विकासाला चालना मिळावी, अशा गप्पा होत असताना प्रत्यक्षात मात्र मनुष्यबळ आणि संसाधनाची उपलब्धताच या ठिकाणी केली जात नसल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. भामरागड तालुक्यातील १६ पैकी १४ पदे रिक्‍त असलेल्या कार्यालयात शिपाई आणि लिपीक या दोघांवरच आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी उरली आहे.

गडचिरोली ः दुर्गम, आदिवासीप्रवण भागात कृषी विकासाला चालना मिळावी, अशा गप्पा होत असताना प्रत्यक्षात मात्र मनुष्यबळ आणि संसाधनाची उपलब्धताच या ठिकाणी केली जात नसल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. भामरागड तालुक्यातील १६ पैकी १४ पदे रिक्‍त असलेल्या कार्यालयात शिपाई आणि लिपीक या दोघांवरच आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी उरली आहे.

आदिवासीबहुल दुर्गम जिल्ह्यांमध्ये कृषी विकासावर भर दिला जात असल्याचे सांगत नेतेमंडळी आपली पाठ थोपटून घेतात. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच राहते. नक्षलप्रवण असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्‍याने हे उदाहरणासह स्पष्ट केले आहे. या ठिकाणी असलेल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात १६ पदे मंजूर आहेत. यातील थोडीथोडकी नव्हे, तर १४ पदे रिक्‍त असून केवळ दोन कर्मचाऱ्यांच्या खांद्यावरच या कार्यालयाचा डोलारा उभा आहे. या दोनच कर्मचाऱ्यांवरच योजनांच्या अंमलबजावणीपासून ते आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांवर आधुनिक तंत्रज्ञान पोचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मंडळ कृषी कार्यालय 
मंडळ अधिकारी कार्यालयात १७ पैकी १२ पदे रिक्‍त आहेत. कृषी पर्यवेक्षक २ तर कृषी सहाय्यक ३ हेच या कार्यालयाचा प्रपंच सांभाळतात. या तालुक्‍याअंतर्गत १२८ गावांचा समावेश असून नक्षलप्रवण असल्याने यातील बहुतांश गावे आजही वीज, पाणी, रस्ते अशा मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

तालुका कृषी अधिकारी पदही रिक्‍त
भामगरागड तालुका हा नक्षलप्रवण आहे. येथील तालुका कृषी कार्यालयात १६ पैकी १४ पदे रिक्‍त आहेत. विशेष म्हणजे तालुका कृषी अधिकाऱ्याचेही येथील पद रिक्‍त आहे. तीनपैकी एक शिपाई आणि एक वरिष्ठ लिपीक मिळूनच या कार्यालयाचा कारभार सांभाळतात. 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
जांभरुण परांडे गावात जन्माला आली...अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे...
शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणारपुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते...
राज्यात आजपासून हरभरा खरेदी परभणी : नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघाच्या...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
शेतीला मिळाली बीजोत्पादनाची साथबोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावशिवारात चंद्रशेखर...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...
पपईच्या बनावट बियाणेप्रकरणी चौघांना अटककोल्हापूर : नामवंत कंपनीच्या पपई बियाण्यांच्या...
उन्हाचा चटका वाढणार; नांदेडला तुरळक...पुणे : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाने...
वऱ्हाडात फळबागांवर चालू लागल्या कुऱ्हाडीअकोला : दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्यांचे जगणे...
'जलवर्धिनी' करतेय लोकशिक्षणातून जल...जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पाण्याचे संधारण आणि...
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....